पिंपळनारेत उद्यापासून चक्रधर स्वामी जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:39 PM2017-08-20T22:39:59+5:302017-08-21T00:23:20+5:30
जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने जिल्हा पातळीवरील भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती सोहळा दि. २२ व २३ रोजी पिंपळनारे, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. वडनेरभैरवनजीक आयोजित सोहळ्यात कीर्तन, भजन, व्याख्याने याद्वारे अहिंसा, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या संदर्भात समाजप्रबोधन होणार आहे.
नाशिक : जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने जिल्हा पातळीवरील भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती सोहळा दि. २२ व २३ रोजी पिंपळनारे, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. वडनेरभैरवनजीक आयोजित सोहळ्यात कीर्तन, भजन, व्याख्याने याद्वारे अहिंसा, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या संदर्भात समाजप्रबोधन होणार आहे.
दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ होऊन दुपारी ४ वाजता श्री मूर्तीची श्रीचक्रधर गोफमंडळ, खरेवाडी, सापुतारा येथील गुजराती आदिवासी कलापथक यांच्यासह मिरवणूक निघेल. सायंकाळी ७ वाजता आचार्यप्रवर श्री वर्धन बीडकर बाबा यांचे विशेष प्रवचन झाल्यानंतर रात्री ८.३०. वाजता कीर्तन सम्राट महंत श्री भीष्माचार्यबाबा (शिंदे) यांचे कीर्तन होईल. ग्रामीण भागात संपन्न होणाºया या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानुभाव समितीचे आचार्यप्रवर सुकेणेकर शास्त्री व पदाधिकाºयांनी केले आहे.
नागराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते उद््घाटन
बुधवारी (दि. २३) जयंती दिनाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता पाठ पारायण व धार्मिक विधीद्वारे होईल. सकाळी ९ वाजता शांतीलाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर आचार्य अध्यक्षतेखाली धर्मसभा होईल. कार्यक्रमाचे उद््घाटन आचार्य महंत नागराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते होईल. धर्मसभेत मुरलीधर आराध्य, सुरेशराज राहेरकर, प्रा. सोमनाथ फुगट यांचे व्याख्यान होईल. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल.