चक्रधर स्वामींचे कार्य समाजासाठी प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:01+5:302021-09-14T04:18:01+5:30
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्हास्तरीय श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव व जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि शासनाच्या कोरोना ...
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्हास्तरीय श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव व जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करीत संपन्न झाला. यावेळी आचार्य महंत बिडकर बाबाजी म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींनी त्या काळातील प्रस्थापित धर्म व्यवस्थेची कर्मकांडाची चौकट मोडून महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा पाया रचला. श्री स्वामींनी त्या काळात सर्व महाराष्ट्रभर परिभ्रमण करून स्त्री-पुरुष समानता, अहिंसेचा संदेश, सर्व व्यसनांपासून दूर राहणे, तसेच वर्णभेदावर देखील स्वामींनी प्रहार केले. त्यानंतरच्या आचार्यांनी स्वामींचे हे मोलाचे कार्य सर्व समाजात पोहोचविले. आजही स्वामींचे हे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायक आहे. तसेच गेल्या सातशे वर्षांपासून महाराष्ट्रात पंथाचे कार्य निरंतर सुरू आहे, असेही आचार्य महंत बिडकर बाबाजी यांनी सांगितले.
याप्रसंगी महंत न्यायव्यास बाबा (मकरधोकडा जि. नागपूर ) यांनी महानुभाव पंथाचे कार्य तसेच श्री चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याचा सखोल परिचय करून दिला. त्याचप्रमाणे महानुभावची काशी असलेल्या श्रीक्षेत्र रुद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी भाषा तत्त्वज्ञान अध्ययन केंद्राची स्थापना होणार असल्याचे माहिती दिली. याप्रसंगी महंत श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी महंत अंकुळनेरकर बाबा, महंत संतोष मुनी शास्त्री, नीलेश दादा बिडकर आदींनी देखील विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.
इन्फो
संत महंतांचा सन्मान
अखिल भारतीय महानुभाव परिषद, नाशिक जिल्हा महानुभाव परिषद व चांदोरी ग्रामस्थ व सद्भक्त परिवार यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मसभेच्या प्रारंभी सकाळी देवास मंगलस्नान, भगवद्गीता पठान, पंथ ध्वजाचे पूजन व मानवंदना, सभामंडपाचे उद्घाटन देवास वंदन, संत महंतांचा सन्मान, आरती, विडा अवसर, देव पूजा, उपहार सोहळा आदी कार्यक्रम संपन्न झाले.
फोटो- १३महानुभाव
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्हास्तरीय श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव व जयंती सोहळ्यात स्मरणिका प्रकाशनप्रसंगी महंत बिडकरबाबा शास्त्री, समवेत महंत न्यायव्यास बाबा, महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, महंत अंकुळनेरकर बाबा.
130921\13nsk_35_13092021_13.jpg
फोटो- १३महानुभाव