सिंधी समाजाच्या चालिहा उत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:21 AM2020-07-17T01:21:47+5:302020-07-17T01:22:03+5:30
नाशिक : सिंधी समाजबांधवांच्या चालिहा उत्सवाला गुरुवारी (दि.१६) सुरुवात झाली असून, यापुढे चाळीस दिवस समाजबांधवांकडून उपवास व धार्मिक पूजा विधी केले जाणार आहेत.
नाशिक : सिंधी समाजबांधवांच्या चालिहा उत्सवाला गुरुवारी (दि.१६) सुरुवात झाली असून, यापुढे चाळीस दिवस समाजबांधवांकडून उपवास व धार्मिक पूजा विधी केले जाणार आहेत. कोरोनाचे संकट असल्याने यंदा समाजाच्या वतीने मोठ्या स्वरूपाचे कार्यक्र म होणार नसले तरी रोज विधीवत धार्मिक कार्यक्र म पार पडतील.
गेल्या २८ वर्षांपासून हा महोत्सव शहरातील होलाराम कॉलनी येथे साजरा केला जातो. यंदा महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी डॉ. विजय सेतपाल महाराज, सुनील राम शर्मा महाराज यांच्या हस्ते होलाराम कॉलनीतील श्री झुलेलाल मंदिरात पूजन करण्यात आले. याप्रसंगी किशन आडवाणी, शंकर जियसंघानी, श्याम मोटवानी, सुनील केसवानी, भगवान मोटवानी, जगदीश तरलेजा, किशोर अमरनानी, महेश वालेचा, रमेश अडवाणी, सेवकराम दर्डा, राजेश गोधानी, सुरेश करमचंदानी, महेश नागपाल आदी उपस्थित होते. आता चाळीस दिवस या मंदिरात सकाळी व सायंकाळी विधीवत पद्धतीने पूजन केले जाणार आहे. कोरोनामुळे यंदा आरोग्य विषयक नियमांचे पालन केले जाणार आहेत.