भाजपाच्या प्रतिष्ठेला सेनेचे आव्हान

By admin | Published: February 9, 2017 01:04 AM2017-02-09T01:04:09+5:302017-02-09T01:04:35+5:30

नवख्यांकडे लक्ष : अनुसूचित जमातीची लढत ठरणार लक्षवेधी

Challenge of BJP's reputation | भाजपाच्या प्रतिष्ठेला सेनेचे आव्हान

भाजपाच्या प्रतिष्ठेला सेनेचे आव्हान

Next

 संदीप झिरवाळ पंचवटी
भाजपाचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात यंदा सेनेच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. त्याबरोबर मनसे, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे उमेदवार रिंगणात असले तरी सेना-भाजपातील राज्यपातळीवरील घडामोडींमुळे या दोन्ही उम्
ोदवारांच्या लढती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यंदाचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने त्यातच या प्रभागातून निवडून येणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला संधी मिळते का? याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीची लढत लक्षवेधी ठरणारी आहे. कॉँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतरही या प्रभागातून कॉँग्रेसच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने कॉँग्रेसची मते कुणाकडे वळतात हे पाहाणेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पूर्वी कॉँग्रेस व त्यानंतर भाजपाचे वर्चस्व असलेल्या या प्रभागात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेने मुसंडी मारली होती. मात्र आता मनसेच्या गणेश चव्हाण यांनी सेनेत प्रवेश केल्याने सेना-भाजपात मतांची रस्सीखेच राजकीय चुरस वाढविणारी ठरणार आहे. या प्रभागातून आजी- माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले असून, भाजपासाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
अनुसूचित जाती अ गटासाठी पूनम धनगर (भाजप), नंदा थोरात (मनसे) आणि सविता म्हस्के (शिवसेना) या पक्षांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. अ गटातील उमेदवार नवखे असल्याने तिघा प्रमुख पक्षांमध्येच लढत होऊ शकते. अनुसूचित जमाती ब गटातून जयश्री पवार (मनसे), सुरेखा बदादे (कॉँग्रेस), जयश्री चव्हाण (शिवसेना) तर विद्यमान नगरसेवक रंजना भानसी (भाजपा) असे चारच उमेदवार निवडणूक लढवित आहेत. आतापर्यंत या प्रभागात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. त्यातच चव्हाण यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे सेना-भाजपाची लढत कशी होते यावर येथील गणित अवलंबून असणार आहे. अर्थात प्रभागातील झोपडपट्टीतील एक गठ्ठा मतदानही प्रभाव पाडणारा असल्याने येथील मते निर्णायक ठरू शकतात. गेल्यावेळी मनसेकडून निवडणूक लढविणाऱ्या पवार व आता कॉँग्रेसकडून रिंगणात उतरलेल्या बदादे यांचे काहीसे आव्हान सेना-भाजपाला पत्कारावे लागेल हेही नाकारून चालणार नाही. नागरिकांचा मागासवर्ग क गटातून असलेले सर्वच उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत ते कसे प्रभाव पाडतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमनाथ वडजे (मनसे), विशाल कदम (शिवसेना), साहेबराव मोराडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) तर गणेश गिते (भाजपा) यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वडजे, मोराडे हे म्हसरूळचे असल्याने दोघांमध्ये मत विभागणी होऊ शकते. तर गिते हे भाजपात असल्याने अन्य गटातील एकगठ्ठा भाजपाचे मतदान त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
कदम यांच्याकडे युवा शक्तीचे मोठे बळ असल्याने सेनेच्या माध्यमातून त्यांचेही आव्हान राहणार आहे. सर्वसाधारण क गटाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. माजी नगरसेवक विरुद्ध अन्य पक्ष अशीच लढत या क गटातून होणार आहे. क गटातून सचिन लुणावत (शिवसेना), तुषार उखाडे (मनसे), दीप्ती हिरवे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) तर अरुण पवार (भाजपा) या उमेदवारांत लढत होऊ शकते. पवार हे माजी नगरसेवक आहेत तर त्यांच्या पत्नी शालिनी पवार या भाजपाच्या नगरसेवक आहेत.
कॉँग्रेसने या प्रभागातून उमेदवारी जाहीर केलेल्या माजी नगर२सेवक वसंत मोराडे यांनी माघार घेतल्याने भाजपा विरुद्ध सेना, मनसे, राष्ट्रवादी अशीच लढत होईल.

Web Title: Challenge of BJP's reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.