फर्निक्युअर ट्रॉलीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:29 AM2018-06-07T01:29:10+5:302018-06-07T01:29:10+5:30

भुजबळांना आवतण : राजकीय वर्चस्ववादाला सुरुवातनाशिक : सप्तशृंग गडावर भाविकांची ने-आण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या फर्निक्युअर ट्रॉलीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याचे पाहून सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने फर्निक्युअर ट्रॉलीचे उद्घाटन आता माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्याचा एकमुखी ठराव करून एकप्रकारे फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला असून, तसे झाल्यास जिल्ह्णातील राजकारणातील ती एक महत्त्वाची घटना ठरणार आहे.

Challenge the chief minister on the occasion of the Ferniors Trolley | फर्निक्युअर ट्रॉलीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आव्हान

फर्निक्युअर ट्रॉलीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आव्हान

Next
ठळक मुद्देभुजबळांना आवतण : राजकीय वर्चस्ववादाला सुरुवात

नाशिक : सप्तशृंग गडावर भाविकांची ने-आण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या फर्निक्युअर ट्रॉलीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याचे पाहून सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने फर्निक्युअर ट्रॉलीचे उद्घाटन आता माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्याचा एकमुखी ठराव करून एकप्रकारे फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला असून, तसे झाल्यास जिल्ह्णातील राजकारणातील ती एक महत्त्वाची घटना ठरणार आहे.
छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक तसेच पर्यटनमंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने सप्तशृंग गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना गडाच्या पायºया चढून जाण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली फर्निक्युअर ट्रॉली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ट्रॉलीच्या येण्या-जाण्याचा मार्ग वन खात्याच्या मालकीचा असल्यामुळे भुजबळ यांच्या प्रयत्नातून वन खात्याकडून सदरची जागा हस्तांतरित करून घेण्यात आली होती. साधारणत: चार ते पाच वर्षे चाललेले ट्रॉलीचे काम जानेवारी महिन्यात पूर्णत्वास आले आहे. महाराष्टÑात पहिल्यांदाच बसविण्यात येणाºया या ट्रॉलीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे, असा आग्रह ट्रॉलीच्या कंत्राटदाराने धरल्यामुळे फडणवीस यांनी त्यास होकारही दिला व त्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन, किसान सभेचा मोर्चा आदी कारणांमुळे मुख्यमंत्र्यांचे येणे लांबणीवर टाकण्यात आले. त्यानंतर पुन्हा चैत्र पौर्णिमेच्या यात्रेपूर्वी ट्रॉलीचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली व पुन्हा ते लांबणीवर टाकण्यात आले. अशा प्रकारे तीन वेळा मुहूर्त हुकला असून, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ट्रॉली निव्वळ उद्घाटनाअभावी पडून आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सप्तशृंगगड ग्रामपंचायतीच्या बैठकीत फर्निक्युअर ट्रॉलीचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात यावे, असा ठराव सदस्यांनी मांडून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. सप्तशृंग गडावरील विविध विकासकामे तसेच दरडींना जाळ्या बसविण्याचे कामे भुजबळ यांच्या पुढाकारानेच पूर्ण होऊ शकल्याचे या ठरावात नमूद करण्यात आल्याने या साºया घटनेतून पुन्हा एकदा जिल्ह्णात भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात होऊन एकप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस व भाजपा सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. अर्थातच ग्रामपंचायतीच्या ठरावावर शासन काय निर्णय घेते त्यावरच या साºया गोष्टी अवलंबून आहेत.
राजशिष्टाचाराचे संकेत
सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने फर्निक्युअर ट्रॉलीच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ यांना साकडे घातले असले तरी, साधारणत: कोणत्याही सरकारच्या कारकिर्दीत विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली असली तरी, ज्या सरकारच्या कारकिर्दीत ते पूर्ण केले जाते त्या सरकारच्या मंत्र्यांकडून त्या कामांचे लोकार्पण करण्याचे संकेत आहेत. त्यामुळे भुजबळ यांनी फर्निक्युअर ट्रॉलीसाठी पुढाकार घेऊन ती पूर्णत्वासाठी प्रयत्न केले असले तरी, विद्यमान राज्यकर्त्यांना डावलून भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करणे ग्रामपंचायतीला सहजासहजी शक्य नसून, सरकारदेखील त्यासाठी तयार होण्याची शक्यता कमीच आहे.
ट्रॉलीचा मुहूर्त लांबणार
मुख्यमंत्री फडणवीस यांना वेळ नसल्याने भुजबळ यांच्या हस्ते फर्निक्युअर ट्रॉलीचे उद्घाटन करण्याचा ठराव करण्यात आल्याने आता सरकारकडून लवकरात लवकर या ट्रॉलीचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्ह्णात शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता जारी आहे. २५ जून रोजी मतदान व २८ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे जून महिन्यात ट्रॉलीचा मुहूर्त लागणार नाही व त्यानंतर नागपूर येथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यातदेखील ते होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Web Title: Challenge the chief minister on the occasion of the Ferniors Trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.