युवराज कोठुळे यांच्या निवडीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:58 PM2018-08-30T22:58:59+5:302018-08-30T22:59:45+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेगलवाडी येथील युवराज बाबूराव कोठुळे यांची निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपतराव सकाळे, सुनील अडसरे, योगेश तुंगार, विनायक माळेकर, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, योगेश तुंगार, दिलीप चव्हाण, कैलास चोथे किरण अडसरे, राजू शर्मा आदी उपस्थित होते.

मौजे शिंदे येथील मावळते उपसभापती संजय तुंगार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कोठुळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. समर्थकांनी आतषबाजी करीत आनंद साजरा केला. यावेळी कोठुळे यांनी सर्व समर्थकांचे आभार मानून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार समिती सुरू करणार असल्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर व पेगलवाडी गावात कोठुळे यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम कडलग, रवि वारूंगसे, परशुराम पवार, छोटू पवार, भूषण अडसरे, कृष्णा महाले, अब्दुल मन्सुरी, भास्कर मेढे, संजय मेढे, यशवंत महाले, संतोष बोडके, भास्कर आचारी आदी उपस्थित होते.
नाशिक बाजार समितीचे उपसभापती युवराज कोठुळे यांच्या निवडीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.
युवराज कोठुळे यांच्या निवडीचा जल्लोषउपसभापतिपदी निवड : त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार सुरू करण्याची ग्वाही त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेगलवाडी येथील युवराज बाबूराव कोठुळे यांची निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपतराव सकाळे, सुनील अडसरे, योगेश तुंगार, विनायक माळेकर, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, योगेश तुंगार, दिलीप चव्हाण, कैलास चोथे किरण अडसरे, राजू शर्मा आदी उपस्थित होते.