अनधिकृत नळ जोडणी शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:13+5:302020-12-26T04:12:13+5:30

देवळालीगाव : सुभाष रोडकडून मालधक्का मार्गाला जोडणाऱ्या जियाउद्दीन डेपो रस्त्याची चाळण झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर ...

The challenge of finding an unauthorized plumbing connection | अनधिकृत नळ जोडणी शोधण्याचे आव्हान

अनधिकृत नळ जोडणी शोधण्याचे आव्हान

Next

देवळालीगाव : सुभाष रोडकडून मालधक्का मार्गाला जोडणाऱ्या जियाउद्दीन डेपो रस्त्याची चाळण झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी उंचवटे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मनपाकडून या परिसराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

सिंधी कॉलनीतील गतिरोधक नादुरुस्त

उपनगर : उपनगर काॅलनी रस्त्यावर टाकण्यात आलेले गतिरोधक उंच असल्यामुळे तर काही ठिकाणी तुटल्यामुळे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या मार्गावर गतिरोधकाची आवश्यकता असली तरी नियमानुसार गतिरोधक तयार करण्यात आलेले नसल्याने सुरक्षिततेसाठी असलेले गतिरोधक धोकादायक ठरू पाहत आहे.

आगारातील खड्डे बुजणार कधी

पंचवटी : नाशिक आगार एक आणि पंचवटी येथील निमाणी बसस्थानकात खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साठत असल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. स्थानकात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून, खड्डे बुजविण्याची आवश्यकता आहे. सध्या पूर्ण क्षमतेने बस सुरू नसल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

घरकूल योजनेचे वाजले तीनतेरा

इंदिरानगर - वडाळा गावातील घरकूल योजनेतील सुमारे पन्नास टक्के घरे लाभार्थ्यांनी ताबे गहाण ठेवली आहेत. तेथील वास्तव्य करणाऱ्या लाभार्थ्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली, त्या ठिकाणी कुंपण करण्यात आले नाही, त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The challenge of finding an unauthorized plumbing connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.