नवनियुक्त ‘मानद वॉर्डन’पुढे मानव-बिबट्या संघर्षाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:47+5:302021-03-24T04:13:47+5:30
राज्य शासनाने वनविभागाकडून छाननी अंतिम प्राप्त झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून राज्यभरातील एकूण २६ जिल्ह्यांचे ...
राज्य शासनाने वनविभागाकडून छाननी अंतिम प्राप्त झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून राज्यभरातील एकूण २६ जिल्ह्यांचे मिळून सुमारे ४८ वन्यजीव प्रेमींचे मागील वन्यजीव संवर्धन व जनजागृती, प्रबोधनपर कार्य लक्षात घेऊन ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून पुढील तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याला दोन मानद वन्यजीव रक्षक मिळाले असून यामध्ये सिडको येथील युवा वन्यजीवप्रेमी वैभव प्रकाश भोगले व मालेगावचे अमित सुभाष खरे यांचा समावेश आहे. भोगले यांच्या रुपाने जिल्ह्याला युवा मानद वन्यजीव रक्षक मिळाला आहे. ते मागील सहा ते सात वर्षांपासून नाशिक वनविभागासोबत वन्यजीव संवर्धनासह पर्यावरण जनजागृतीचे काम करत आहे. रस्ते अपघातात वन्यजीवांचा जाणारा बळी रोखण्यासाठी भोगले यांनी त्यांच्या संस्थेमार्फत विविध रस्त्यांवर सूचना फलकही उभारले आहेत. तसेच अपघातात जखमी बिबटे, कोल्हे, गिधाड, काळविटांसह दुर्मीळ सर्पांनाही रेस्क्यू करत त्यांच्या शुश्रूषेसाठी भोगले अग्रेसर राहत असल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर करत शासनाने त्यांची निवड केली आहे. तसेच खरे हे यापूर्वीही या पदावर कार्यरत होते, त्यांची पुन्हा नियुक्ती करुन शासनाने त्यांना तिसऱ्यांदा वन्यजीव संवर्धन करण्याची संधी दिली आहे. भोगले व खरे यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा राहणार आहे.
--इन्फो--
सतत रहावे लागणार ‘ॲलर्ट’
जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे छुप्या पध्दतीने जिल्ह्यात मांडूळसारखे सर्प, गोड्या पाण्यातील कासव आदींची होणारी तस्करी तर घुबडासारख्या पक्ष्यांचा अंधश्रध्देपोटी जाणारा बळी रोखण्यासाठीही सतर्क राहून वनविभागाला वेळोवेळी माहिती देऊन कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
---
फोटो आर वर २३वैभव व २३अमित नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
230321\23nsk_8_23032021_13.jpg
===Caption===
अमीत खरे