नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान - तेलंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:44 AM2018-05-24T00:44:56+5:302018-05-24T00:44:56+5:30
बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले.
नाशिक : बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले. गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत बुधवारी (दि.२३) तेविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कांतिबेन शाह यांच्या स्मृतीत ‘नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या समाजापुढील आव्हाने’ विषयावर बोलताना अजित कुमार यांनी मानवाच्या आदीमानवापासून ते आतापर्यंतच्या पिढ्यांमध्ये घडून आलेले विविध बदल सांगितले. ते म्हणाले, रामायण, महाभारताच्या काळापासून गुन्हेगारीचे अस्तित्व असले तरी सध्याच्या पिढीमधील गुन्हेगारीने अतिशय विकृत स्वरूप प्राप्त केले आहे. खून, बलात्कारांच्या वाढत्या भयानक घटनांसोबतच अॅसिड हल्ले आणि ब्लेड हल्ल्यातून या विकृत गुन्हेगारी दिसून येत आहे. मृतदेहाची विटंबना करण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. ही नव्या पिढीसमोरील आव्हाने असून, याचा नव्या पिढीच्या समाजालाही सामना करावा लागणार आहे. १९८० नंतरच्या पिढीत गुणसूत्रातील तिसरा धागा जागृत झाला असून, त्याचा प्रभाव मानवी जिवनावरही दिसून येऊ लागल्याने तरुण पिढीचे एकावेळी केवळ एकच ज्ञानेंद्रिय पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने या पिढीकडून तुलनेत अधिक प्रयत्नांनंतर प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आजचे व्याख्यान, विषय : मायबाप : एक कृतज्ञता , वक्ते : कवी राजेंद्र उगले