मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 01:01 AM2019-11-17T01:01:52+5:302019-11-17T01:02:18+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

 Challenge of revaluation before administration after declaration of assistance | मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान

मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान

googlenewsNext

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
राज्यपालांनी शनिवारी (दि.१६) राज्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना खरीप पिकासाठी हेक्टरी ८ हजार रुपये व बारमाही तथा फलोत्पादन पिकांसाठी १८ हजार रुपये मदतीची घोषणा केली. परंतु, ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या क्षेत्रासाठीच देण्याची अट असल्याने मदतीची रक्कम प्रत्यक्ष शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत संकलित केलल्या माहितीचे फेरमूल्यांकन करावे लागणार आहे.
आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्हाभरातील सात लाख ७६ हजार ९७० शेतकºयांच्या एकूण ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध आहे. १ लाख ५६ हजार ३५०.७६ हेक्टर बागायती, ४ लाख ९ हजार २७५.८१ हेक्टर जिरायती व ८१ हजार ६८९ हेक्टर बारमाही तथा फलोत्पादन पिकक्षेत्राचा समावेश आहे. या माहितीचे राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदत घोषणेच्या नियम निकषांनुसार पुनर्मूल्यांकन करून पीडित शेतकºयांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासना समोर असणार आहे. दरम्यान, शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्यपाल शनिवारी नाशिक जिल्ह्णाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार होते. परंतु, राज्यपालांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून थेट मदतीची घोषणा केल्याने अतिवृष्टीने कोलमडून पडलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
नुकसान लाखात, भरपाई हजारात
पाटोदा : उभारी देण्यासाठी भरीव मदत मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांना राज्यपालांनी हेक्टरी आठ हजार रु पये अशी तुटपुंजी मदत देण्याची घोषणा केल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकसान लाखात झाले असून, मदत हजारात दिली जाणार असल्याने ही एक प्रकारे शेतकºयांची थट्टाच केली जात असल्याने नाराजी पसरली असून, शेतकºयांना अनुदान वाढवून देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
मका पिकासाठी हेक्टरी पस्तीस ते चाळीस हजार रु पये खर्च झालेला असून उत्पन्न सुमारे लाख रु पये निघाले असते. नुकसान लाखात होऊन भरपाई अनुदान हे फक्त आठ हजार
रु पये जाहीर झाले आहे. तर द्राक्षबागासाठी हेक्टरी खर्च चार ते पाच लाखाच्या आसपास झालेला असून, हेक्टरी नुकसान वीस ते बावीस लाख रु पयांचे झालेले असताना हेक्टरी अठरा हजार असे तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने शेतकºयांची बोळवण करून मोठी निराशा केली आहे
निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी हेक्टरी पाच लाख रु पये खर्च झालेला आहे. मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण द्राक्षबागेचा चुराडा झाला आहे नुकसानभरपाई अनुदान हेक्टरी अठरा हजार रु पये जाहीर झाल्याने ही एक प्रकारे शेतकºयांची थट्टाच केली आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर बोरणारे यांनी म्हटले आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना या वर्षी अमेरिकन लष्करी अळी व इतर संकटांशी दोन हात करून का होईना खरीप पिके चांगली आल्याने आनंदात असतानाच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका पिकाचे हेक्टरी लाख ते दीड लाख रु पयांचे नुकसान झालेले असताना जाहीर झालेली अनुदान रक्कम म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.
- रवींद्र शेळके, शेतकरी, ठाणगाव

Web Title:  Challenge of revaluation before administration after declaration of assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.