सेना-भाजपासमोर मनसेचे आव्हान

By admin | Published: January 16, 2017 01:24 AM2017-01-16T01:24:39+5:302017-01-16T01:24:52+5:30

सेना-भाजपासमोर मनसेचे आव्हान

Challenge of Sena-BJP-BJP MNS | सेना-भाजपासमोर मनसेचे आव्हान

सेना-भाजपासमोर मनसेचे आव्हान

Next

गोकूळ सोनवणे  सातपूर
गेल्या पाच वर्षांच्या काळात सातपूर विभाग मनसेचा बालेकिल्ला म्हणून उदयास आला होता. जसा उदयास आला तसाच मावळतीला गेला. केवळ स्थायी समिती सभापती सलीम शेख यांच्यामुळे थोड्याफार प्रमाणात अस्तित्व टिकून आहे. अस्तित्वाच्या लढाईत शिवसेना व भाजपाच्या समोर मनसेने आव्हान उभे केले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सातपूर विभागातून मनसेची उमेदवारी घेऊन शशिकांत जाधव हे एकमेव नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतरच्या २०१२ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या झंझावाताने सातपूरच नव्हे तर संपूर्ण शहरात मनसेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते आणि महापालिकेत मनसेने सत्ता काबीज केली होती.
त्यावेळी सातपूर विभागातून १४ पैकी शशिकांत जाधव, सलीम शेख, उषा शेळके, सुरेखा नागरे, सविता काळे, रेखा बेंडकोळी आदि मनसेचे नगरसेवक निवडून आले होते.

Web Title: Challenge of Sena-BJP-BJP MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.