‘चलो भायखळा’ भुजबळ समर्थकांची हाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:59 PM2018-05-05T15:59:00+5:302018-05-05T15:59:00+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला असला तरी, त्याबाबतची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे पाहून आता सोमवारी सकाळी अकरा वाजता भुजबळ तुरूंगातून जामीनावर बाहेर पडतील असे सांगितले जात आहे.
नाशिक : तब्बल २६ महिन्यानंतर राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ जामीनावर तुरूंगातून सुटणार असल्याने त्यांची कार्यभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भायखळा येथील आॅर्थरोड तुरूंगाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी भुजबळ समर्थकांनी सुरू केली असून, त्यासाठी सोशल माध्यमाद्वारे ‘चलो भायखळा’ अशी साद घातली जात आहे. नाशिक शहरातून हजारो कार्यकर्ते सोमवारी मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीला लागले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला असला तरी, त्याबाबतची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे पाहून आता सोमवारी सकाळी अकरा वाजता भुजबळ तुरूंगातून जामीनावर बाहेर पडतील असे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याने सोमवारी सकाळी ते रूग्णालयातून तुरूंगात हजर होतील व तेथील प्रक्रिया पुर्ण झाल्यावर बाहेर येतील त्यावेळी त्यांचे शक्तीप्रदर्शनाद्वारे जंगी स्वागत करण्याची तयारी राष्टÑवादी कॉँग्रेस व भुजबळ समर्थकांनी केली आहे. त्यासाठी सर्वांनी भायखळ्याच्या आॅर्थरोड कारागृहाबाहेर जमावे असे आवाहन करण्यात आले असून, सोशल माध्यमाद्वारे ‘चलो भायखळा’ अशी साद घालण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच या संदर्भातील संदेश फिरू लागले असून, ‘टायगर इज कमबॅक’ अशी पोस्ट तयार करून त्याखाली ‘चलो भायखळा’असे नमूद करण्यात आले आहे. भुजबळ यांची कर्मभुमी असलेल्या नाशकात देखील भुजबळ यांच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ लगेचच नाशकात येण्याची शक्यता नसली तरी, त्यांच्याभेटीसाठी हजारोंच्या संख्येने भायखळा येथे जाण्याचे नियोजन केले जात आहे. शनिवारी सकाळी या संदर्भात राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. भुजबळ यांच्या जामीन मंजूर झाल्याच्या वृत्तापासून राष्टÑवादी भवन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रेलचेलीने गजबजले आहे. सोमवारी भुजबळ यांच्या सुटकेप्रसंगी आॅर्थररोड येथे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले तसेच आगामी काळात राष्टÑवादी आक्रमकपणे राजकीय वाटचाल करणार असल्याचे सांगितले.