चल गं सये, नागोबाला पुजायला...
By admin | Published: August 8, 2016 12:52 AM2016-08-08T00:52:34+5:302016-08-08T00:52:45+5:30
नागपंचमी : शहर परिसरातील मंदिरांमध्ये महिलांची गर्दी
नाशिक : शहर व परिसरात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळांमध्येही रविवारी सुटी असल्याने शनिवारीच नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
लिटील स्टार प्ले स्कूल
कामटवाडे येथील विठ्ठलनगरमध्ये व्ही. डी. मटाले संचलित लिटिल स्टार प्ले स्कूलमध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली. शिक्षिकांनी मातीचे वारूळ बनवून त्यात मातीची नागदेवता ठेवून पूजा केली. शिक्षक चिंचोलकर यांनी नागपंचमीचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुरेखा मटाले व शिक्षक उपस्थित होते.
आदर्श शिशु विहार
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श शिशुविहार, गोरेरामलेन शाळेत नागपंचमी सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक आशा उमाप यांच्या हस्ते दूध, फुटाणे, लाह्या आदिंचा नागोबाला नैवेद्य दाखविण्यात आला. शिक्षिका उज्ज्वला जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी सणाविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी शेतकरी, गारुडी आदिंच्या वेशभूषेत उपस्थित होते. कार्यक्रमास रंजना देवरे, अर्चना वाळके, स्वाती धोंडगे, शोभा मगर, भावना कळमकर, पंकजा शिरसाठ, नूतन देवरे, योगीता सोनवणे, वैशाली गावले, अंबादास पारधी, प्रशांत मोरे, नानासाहेब पाटील, भाऊसाहेब लोखंडे आदिंनी प्रयत्न केले.