नासिक जिमखान्यातील मुलींच्या बास्केटबॉल संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:47+5:302021-01-14T04:12:47+5:30

फिटनेस फर्स्ट व के.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत नाशिक जिमखानाच्या मुलींच्या संघाने ...

Championship for girls basketball team at Nashik Gymkhana | नासिक जिमखान्यातील मुलींच्या बास्केटबॉल संघाला विजेतेपद

नासिक जिमखान्यातील मुलींच्या बास्केटबॉल संघाला विजेतेपद

Next

फिटनेस फर्स्ट व के.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत नाशिक जिमखानाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले.

या स्पर्धेत नाशिकच्या प्रमुख चार संघांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात आली होती. स्पर्धेचा अंतिम सामना नाशिक जिमखाना आणि फिटनेस फर्स्ट अकॅडमी संघ यांच्यात होऊन अंतिम सामन्यात जिमखान्याच्या मुलींनी आक्रमक खेळ करत मध्यंतरापर्यंत २३-६ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या दुसऱ्या भागात जिमखाना संघाने आपली आघाडी कायम राखत ४६-१२ अशा फरकाने सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नासिक जिमखाना संघाची वेदिका पन्हाळे हिला तर स्पर्धेची बेस्ट शूटर म्हणून सत्या राय या दोघींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नासिक जिमखाना संघाला प्रशिक्षिका स्वरांगी सहस्त्रबुद्धे आणि स्वाती रणभिसे यांचे मार्गदर्शन लाभले. नासिक जिमखाना संघाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड संस्थेचे सचिव राधेश्याम मुंदडा, सहसचिव शेखर भंडारी,तसेच बास्केटबाल गेम सेक्रेटरी राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड व झुलकर जहागीरदार व संजय मराठे यांनी अभिनंदन केले.

फोटो ११ बास्केटबॉल

कॅप्शन : नासिक जिमखाना विजयी संघासमवेत संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव राधेश्याम मुंदडा, शेखर भंडारी, अभिषेक छाजेड, राजेश भरविरकर, झुलकर जहागीरदार, स्वरांगी सहस्त्रबुद्धे, स्वाती रणभिसे, संजय मराठे व बास्केटबॉलपटू.

Web Title: Championship for girls basketball team at Nashik Gymkhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.