बुधवारी चंद्रदर्शनाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:47 AM2018-05-13T00:47:10+5:302018-05-13T00:47:10+5:30
मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला बुधवारी (दि.१६) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनाचा प्रयत्न करावा व चंद्रदर्शन घडल्यास शाही मशिदीत प्रत्यक्ष हजर राहून धर्मगुरूंच्या बैठकीत ग्वाही द्यावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.
नाशिक : मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला बुधवारी (दि.१६) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनाचा प्रयत्न करावा व चंद्रदर्शन घडल्यास शाही मशिदीत प्रत्यक्ष हजर राहून धर्मगुरूंच्या बैठकीत ग्वाही द्यावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची येत्या बुधवारी २९ तारीख असून, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी चंद्रदर्शन घडल्यास गुरुवारी रमजानचा पहिला उपवास मुस्लीमबांधव करतील. चंद्रदर्शनाची अधिकृत ग्वाही प्राप्त न झाल्यास चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात होईल. एकू णच रमजान पर्वचा प्रारंभ चंद्रदर्शनावर अवलंबून असून, येत्या बुधवारी संध्याकाळी याबाबत निर्णय धर्मगुरूंकडून परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळी शाही मशिदीत चांद समितीच्या वतीने शहरातील सर्व मशिदींच्या धर्मगुरूंना बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त झाल्यास रात्रीपासूनच विशेष ‘तरावीह’च्या नमाजपठणाला प्रारंभ होईल.