निफाड कारखाना सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:53 AM2019-04-14T00:53:20+5:302019-04-14T01:02:52+5:30

नाशिक : थकबाकीपोटी जिल्हा बॅँकेने जप्त केलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेकराराने देऊन पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा बँकेने सुरू केलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद मिळाला असून, भाडेकराराच्या काढलेल्या निविदेस पाच कारखान्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा कारखाना सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 Chances of the start of the Nifed factory | निफाड कारखाना सुरू होण्याची शक्यता

निफाड कारखाना सुरू होण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देजप्त मालमत्तेच्या विक्रीसाठी निविदा काढल्या गेल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.

नाशिक : थकबाकीपोटी जिल्हा बॅँकेने जप्त केलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेकराराने देऊन पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा बँकेने सुरू केलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद मिळाला असून, भाडेकराराच्या काढलेल्या निविदेस पाच कारखान्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा कारखाना सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखाना या कारखान्यांकडे अनुक्रमे १३८ कोटी व १४० कोटींची थकबाकी झाली असून, दोन्हीही कारखान्यांचे व्यवस्थापन थकबाकीची रक्कम मुदतीत भरू शकले नाहीत, उलट कारखाने डबघाईस येऊन बंद पडले आहेत. कारखान्यांकडून कर्जवसुली होत नसल्याने बँकेने सदरची रक्कम एनपीएमध्ये गेल्याने कारखान्यांची जप्ती करून जप्त मालमत्तेच्या विक्रीसाठी निविदा काढल्या गेल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.

Web Title:  Chances of the start of the Nifed factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.