चणकापूर धरण उशाशी
By Admin | Published: May 14, 2016 10:59 PM2016-05-14T22:59:08+5:302016-05-15T00:32:45+5:30
आरक्षण : पाण्यावर इतरांचाच अधिकार अधिक
शेखर महाले कनाशी
चणकापूर आणि पुनंद प्रकल्पातून मालेगाव आणि सटाणा शहरासाठी पाणी आरक्षित केले जाते. जळगावकरही पाण्यावर हक्क सांगू लागले आहेत, चणकापूर धरण उराशी असूनसुद्धा त्यावर इतरांचा अधिकार आहे.
कळवण, बागलाण, देवळा व मालेगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. १४ जानेवारीला पाण्याचे पहिले आवर्तन दिले जाते. त्यानंतर शिल्लक पाणीसाठ्यानुसार आवर्तन दिले जाते. चणकापूर धरणातील मोठा साठा मालेगावसाठी आरक्षित असतो. झालेला पाऊस आणि आरक्षित पाणी या व्यतिरिक्त जे पाणी शिल्लक राहू शकते त्याचा अंदाज करून पाणी आवर्तन दिले जाते. कळवण, बागलाण, देवळा आण िमालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून असून, चणकापूरमधील पाणीसाठा कमी झाल्यास अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून पाणी घेऊन पाणी सोडले जाते, तत्कालीन परिस्थितीनुसार चणकापूरचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आज पाण्याची मागणी वाढली आहे, सर्वच क्षेत्रात वाढ झाल्याने शासनाने गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबरोबर बंधारे बांधले तर भविष्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. पूर्वी भरपूर पाऊस पडायचा. गिरणा, बेहडी, पुनंद नदी वाहायची. काळ लोटला, लोकसंख्या वाढली, गरजेनुसार पाणी योजना झाल्या. नवीन धरणे व प्रकल्प झाले, पर्जन्यमान कमी झाले
आहे.