देवळा तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 02:15 PM2018-10-30T14:15:36+5:302018-10-30T14:15:44+5:30

लोहोणेर : - देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून या चंदन चोरांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Chandan thieves in Deola taluka | देवळा तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट

देवळा तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट

Next

लोहोणेर : - देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून या चंदन चोरांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आज विठेवाडी भउर शिवारातील अहेर वस्ती नजीकच्या शिव नाल्यात अंदाजे दहा ते १५ वर्षा पुर्वीचे पक्के झालेले , १२ इंच रु ंदी असलेले ३० फूट उंचीचे चंदनाचे झाड भर रस्त्यावरून कापुन नेले. लोहोणेर कळवण रसत्या वरील भउर ,विठेवाडी दरम्यान लगत उभे असलेले परिपक्कव झालेले , विठेवाडी येथिल शेतकरी दयाराम बोरसे यांच्या बांधावर असलेले, आजच्या बाजार भावानुसार हजारो रु पये किंमत असलेले चंदनाचे झाड कापुन त्याचे तुकडे करून पोबारा केला. नेहमीच अत्यंत वर्दळीचा रस्ता असुनही रात्रीच्या अंधारात चंद्राच्या उजेडाचा फायदा घेवुन आसपासचे चंदनाची झाडे तोडुन त्याची तस्करी होत असल्यामुळे दरवर्र्षी परिसरातुन चंदनाची तस्कररी होत असल्या मुळे शेतकºयां बांधावर राखलेले लाखो रु पयाचे मुल्य असलेली जंगल संपत्ती दिवसाढवळ्या चोरी जात असुन वन विभागाने कुठलिही नोंद केलेली नाही.

Web Title: Chandan thieves in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक