चंदनचोरांची टोळी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:53 AM2019-03-28T00:53:25+5:302019-03-28T00:53:43+5:30

शहरासह उपनगरांमध्ये चंदन वृक्षांची चोरी करणाऱ्या चार संशयितांच्या टोळीला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणांवरून चंदनाची झाडे कापून नेल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

Chandana Chora's possession | चंदनचोरांची टोळी ताब्यात

चंदनचोरांची टोळी ताब्यात

Next

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये चंदन वृक्षांची चोरी करणाऱ्या चार संशयितांच्या टोळीला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणांवरून चंदनाची झाडे कापून नेल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, गंगापूररोड आदी भागांमध्ये असलेले चंदनाचे वृक्ष शोधून ती रात्रीच्या अंधारात इलेक्ट्रिक कटरने कापून लंपास करण्याच्या घटना मागील काही महिन्यांमध्ये उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर तिडके कॉलनी परिसरातील चांडक सर्कल भागात असलेल्या एका बंगल्याच्या आवारातून चंदनवृक्ष कापून लंपास करीत असल्याची बाब एका फार्म हाउसवरील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आली. त्याने चंदनचोरांना हटकले असता चोरट्यांनी त्यास मारहाण करून चंदनवृक्ष घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय माणिक जाधव (२२, रा. दत्त मंदिर), विजय शंकर गायकवाड (२२, सातपूर), रामा विलास कोळी (४०, रा. अंबड-लिंकरोड), लक्ष्मणतात्या पवार (२२, रा. शेणीतगाव, घोटीरोड) या संशयितांना चंदनचोरीप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, हवालदार भिसे यांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित तिडके कॉलनी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी तिडके कॉलनीतील गुन्ह्याची कबुली देतानाच, याच टोळीने नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनाची झाडे तोडल्याचीही कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल आहे. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Chandana Chora's possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.