चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:47 PM2019-05-12T18:47:17+5:302019-05-12T18:47:49+5:30
जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
सलग तीन दिवस चाललेल्या या उत्सवात पहिल्या दिवशी जायखेडा पोलीस ठाण्यातील चाँदशहावलीबाबांच्या दरग्यापासून ते जुन्या इंग्रजी शाळेतील चाँदशहावलीबाबाच्या पुरातन दरग्यापर्यंत ढोल ताश्या व बँड पथकांच्या तालावर संदल मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत जायखेडा व परिसरातील सर्व जाती धर्मांच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. संदल मिरवणूक संपल्यानंतर हिंदू-मुस्लीम धर्मातील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पुढारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते दरग्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात येऊन विधीवत पूजा करण्यात आली.
या वेळी सरपंच शांताराम अिहरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य, उरूस उत्सव कमेटीचे संजय बच्छाव, शफीक कादरी, देविदास पाटील, दत्तात्रेय अहिरे, भास्कर अहिरे, सुशील गुरव, तुषार मोरे, लक्ष्मण सोनवणे, विजय बच्छाव, राजेश सावळे, निकेश कोळी, गोरख गर्दे, शिवाजी गुंजाळ, मंगेश राऊत, भालचंद्र नेरकर, इस्माईल शहा आदींसह पोलीस कार्मचारी, उरूस उत्सव समितीचे सदस्य, तसेच जायखेडा व पंचक्र ोशीतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
दुसºया दिवशी दर्गा परिसरात यात्रा उत्सव संपन्न झाला. यावेळी हिंदू मुस्लिम भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सिरणी व साखर फुटणे अर्पण करून शेकडो भाविक येथे नतमस्तक झाले. रात्री मनोरंजनसाठी सोपान कोळी डोनगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्र म पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला.
तिसºया दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी जिल्ह्यातील अनेक नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. विजयी मल्लांसाठी विविध वस्तूंबरोबरच रोख रकमेची अनेक बक्षिसे देण्यात आली. उरूस उत्सवाच्या यशस्वितेसाठी चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव कमेटी, गावातील विविध सामाजिक संस्था व विविध मंडळाचे कार्यकर्ते, जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कार्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.