चांदोरी-सायखेडा गोदावरी नदीवरील पूल दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 07:13 PM2019-04-05T19:13:37+5:302019-04-05T19:15:29+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या महत्वाच्या जोडल्या जाणाऱ्या गावाना सध्या खडतर पुला (फरशी) वरु न वर्दळ करावी लागत असुन ह्या पुलाची दुरु स्ती त्वरीत व्हावी अशी मागणी या गावातील नागरिकानी केली आहे.
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या महत्वाच्या जोडल्या जाणाऱ्या गावाना सध्या खडतर पुला (फरशी) वरु न वर्दळ करावी लागत असुन ह्या पुलाची दुरु स्ती त्वरीत व्हावी अशी मागणी या गावातील नागरिकानी केली आहे.
हजारपेक्षा अधिक पूल ब्रिटिशकालीन आहेत. तेव्हाचे सगळेच स्थापत्य भरभक्कम. त्यामुळेच या पुलांनी एवढी वर्षे ‘विनाकुरकूर’ सेवा दिली. आता मात्र त्यातील अनेक पूल जर्जर झाले आहेत. ब्रिटिशांच्या कारभारातही एवढी व्यावसायिकता, की पुलाचे आयुर्मान संपल्याचेही त्यांच्याकडून कळविण्यात येते. तरीही त्यांतील अनेक पुलांना सेवा-निवृत्त करण्यात आलेले नाही. निधीची कमतरता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे त्याचे महत्वाचे कारण.
सायखेडा चांदोरी प्रवास करण्यासाठी साधारणपणे ५ ते ६ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, पर्यायाने वेळेचे व इंधनाचे नकसान होत आहे. सायखेडा हि बाजारपेठ व आठवडे बाजार, तसेच कामगार वर्ग, विद्यार्थी वर्गाला या पुलावरु न येजा करावी लागत आहे. त्यामुळे गावातील नागरिक या पुलाची दुरु स्ती त्वरीत करावी अशी मागणी करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची दुरु स्ती त्वरित केल्यास संभावित धोके टळु शकतात. या पुलावरु न मोटरसायकल तसेच प्रवाशी वाहतुक करणाऱ्या गाड्याही ये जा करतात, पण या धोकादायक पुलावरु न ग्रामस्थ जीव मुठीत घेवुन प्रवास करतात.
प्रतिक्रि या
गोदावरी नदीवरील पूल हा पूर्णपणे निकामी झाला आहे. भविष्यात पावसाळ्यामधे येणाºया पुरात हा पूल वाहून जाण्याची शक्यता आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरु स्ती करण्यात यावी. पर्यायाने पुलाच्या बांधकामामुळे नदीतील पाणी अडविण्याची क्षमता वाढून त्याचा फायदा दारणासांगवी पर्यंतच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो.
- देवराम निकम
माजी सरपंच.