चांदोरी गाव पूर्णत: लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:36 PM2020-04-02T22:36:06+5:302020-04-02T22:36:32+5:30
कोरोना विषाणूचा आपल्या गावात शिरकाव होऊ या साठी चांदोरी करांनी कंबर कसली आहे. या गावात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अखेरचा बाजार भरवला गेला होता मात्र, मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने संपूर्ण बाजार उठविण्यात आला. ग्रामपालिकेने च्या वतीने पूर्णत: लॉकडाउन करण्यात आले आहे.
चांदोरी : कोरोना विषाणूचा आपल्या गावात शिरकाव होऊ या साठी चांदोरी करांनी कंबर कसली आहे. या गावात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अखेरचा बाजार भरवला गेला होता मात्र, मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने संपूर्ण बाजार उठविण्यात आला. ग्रामपालिकेने च्या वतीने पूर्णत: लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावातील सर्व दुकाने ,सेवा येत्या ६ एप्रिलपर्यंत पुर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता एखादे दुकान सुरू असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपालिका प्रशासनाने दिले आहे. कोणतीही व्यक्ती पार, ओटा, रस्ता, मंदिर, मस्जिद, सार्वजनिक चौक या ठिकाणी विना कामे बसणाऱ्या व फिरणार्या वर संचार बंदीच्या कायद्या नुसार कारवाई करण्याचे आदेश सायखेडा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी दिले आहे. तसेच गावाच्या प्रवेश द्वारा जवळ आपत्ती व्यवस्थापन समिती सेवा देत आहे. समितीचे स्वयं सेवक ग्रामपालिकेच्या आदेशानुसार गावातील ग्रामस्थांना बाहेर जाण्यास व इतरांना येण्यास मज्जाव केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये गावकऱ्यांनी स्वत:हूनच गावच्या सीमा बंद केल्या आहेत. विशेष म्हणजे काही गावांमध्ये तर आधारकार्ड दाखवूनच प्रवेश दिला जात आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तसेच गावातील युवावर्गही यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात लॉकडाउन मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. बाहेरून येणाºया वाहने किंवा नागरिकांना गावाच्याच प्रवेशद्वारावर अडविले जास्त आहे. तेथेच खातरजमा केल्यानंतर गावात प्रवेश दिला जात आहे. गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी उघडली जात असून, त्यानंतर ठरावीक वेळेनंतर बंद करण्यात येत संचारबंदीचे पालन केले जात आहे.