चंद्रात्रे यांना आयएमएच्या राज्य कार्यकारीणीत स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:15+5:302020-12-29T04:13:15+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे पदग्रहण उस्मानाबादला झाले. डॉ.रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्र ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे पदग्रहण उस्मानाबादला झाले. डॉ.रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सचिवपदी डॉ.पंकज बंदरकर यांनी तर उपसचिवपदी नाशिकच्या डॉ.समीर चंद्रात्रे यांची निवड झाली आहे.
राज्य कार्यकारिणीवर एकूण चार उपाध्यक्ष डॉ.प्रकाश चंद्र बोरणा, डॉ.रवींद्र कुटे, डॉ.ज्योती चिटगुपकर, डॉ.शेखर गालिंदे आणि चार सहसचिव डॉ.मंगेश पाटे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ.समीर चंद्रात्रे, डॉ.शिवाजी काकडे यांची निवड केली गेली. यंदा कोविड काळात डॉक्टरांसाठी म्हणून, नाशिक उपाध्यक्षा, डॉ.प्राजक्ता लेले यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वर ‘आविष्कार’ नामक कला सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण राज्यभर राबविला, अनेक प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले. डॉ.प्राजक्ता लेले यांना या वर्षी आयएमए सांस्कृतिक मंडळ चेअरमन हे पद देऊन गौरविण्यात आले. येत्या वर्षातही असाच एक मोठा उपक्रम हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे. कोरोना काळात नाशिक आयएमएने डॉ.समीर चंद्रात्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली जे प्रभावी उपक्रम राबविले. त्याची पोचपावती म्हणून नाशिक शाखेला राज्यस्तरीय ५ आणि २ राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळाली असून, विशेष उल्लेख नाशिक आयएमए शाखेचे सचिव डाॅ.सुदर्शन आहिरे यांना सर्वोत्तम सेक्रेटरी म्हणून राष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत करण्यात आले आहे. आयएमए नाशिकचे माजी अध्यक्ष आणि माननीय आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या उपस्थितीत पुरस्कृतांचे कौतुक करण्यात आले. भूलतज्ज्ञ डॉ.निनाद चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.