अवकाश संशोधन कार्यासाठी ‘चांद्रयान-२’ मोहीम उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:31 AM2019-09-23T00:31:43+5:302019-09-23T00:32:27+5:30
चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो.
चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो. विशेषत: या उपग्रहावर लावलेल्या कॅमेऱ्याने हवी तशी छायाचित्रे पाठविण्यास विक्रम लॅण्डर आॅरफीट यशस्वी झालेले दिसते. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उपग्रम मोहीम आखणारा भारत हा जगातील पहिलाच देश असून, या ठिकाणी असलेली माती, खडक, हवामान यांचा अभ्यास यातून होणार आहे. इस्त्रोची ही मोहीम सुमारे ९0 टक्के यशस्वी झाली, असे मत जगभरातील शास्त्राज्ञांनी व्यक्त केले आहे. विक्रम लॅँडर या उपग्रहाचे कार्य आणखी सुमारे सात वर्ष सुरू राहणार असून, त्याचा कार्य कालावधी वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. या मोहिमेतून संशोधनासाठी तसेच शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी चांगली माहिती मिळत असल्याने अमेरिकेतील नासा आणि युरोपातील अन्य अवकाश संशोधन संस्थांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील शास्त्रज्ञांचे आणि इस्त्रोचे देशभरातील शास्त्रज्ञांनी अभिनंदन केले असून, हा चांगला प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सदर उपग्रह हा पूर्वीच्या नियोजनानुसार दि. ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरणे अपेक्षित होते, परंतु तांत्रिक कारणांनी ते शक्य झाले नाही. तरी याला अपयश म्हणता येणार नाही. नासाने पुढील काळात म्हणजे इ. स. २0१४ मध्ये अर्टेमीस मिशन ही मोहीम आखली आहे. यात मन मिशन ही मोहीम असल्याने सध्या छायाचित्राचा उपयोग होणार आहे, असेही नासाने म्हटले आहे. इस्त्रोने मिशन चांद्रयान- २ या मोहिमेनंतर आता चंद्रयान- ३ ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. दि. २१ सप्टेंबरपासून हा उपग्रह काळोखात जाणार आहे. साधारणत: १४ दिवसांचा हा कालावधी असणार आहे. त्यानंतर पुन्हा या उपग्रहावरून वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतील. चंद्राच्या जवळ अनुकूल वातावरण नसल्याने उपग्रहाचे लॅँडिंग होऊ शकले नाही. ही मोहीम १00 टक्के यशस्वी होऊ शकली नाही, याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. सिवेन यांच्यासह सर्वच भारतीय जनता भावनिक झाली होती. परंतु आतापर्यंत चांद्रयानची कोणतीही मोहीम ४0 टक्केपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे भारताची मोहीम त्यामानाने खूपच यशस्वी ठरली आहे. आगामी काळात चंद्रावर पाणी, बर्फ आणि अन्य गोष्टींच्या संशोधनासाठी ही मोहीम यशस्वी ठरणारी आहे.