चांदशीत प्लॅस्टिकबंदी जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:03 AM2018-08-07T01:03:38+5:302018-08-07T01:03:52+5:30
चांदशी ग्रामपंचातीच्या वतीने गावात नागरिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत व त्यावर अंमलबजावणी करण्याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, ग्रामस्थ व दुकानदारांकडून प्लॅस्टिक संकलन करण्यात आले.
गंगापूर : चांदशी ग्रामपंचातीच्या वतीने गावात नागरिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत व त्यावर अंमलबजावणी करण्याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, ग्रामस्थ व दुकानदारांकडून प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिकवर बंदीबाबत तसेच त्याचे होणारे दुष्परिणामांची माहिती देण्यात येत आहे. प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावागावातून जनजागृती केली जात आहे. चांदशी गावात प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती व अंमलबजावणी अभियान राबविण्यात येऊन ग्रामस्थ व दुकानदार यांच्याकडून प्लॅस्टिकबंदी असलेल्या प्लॅस्टिक वस्तू संकलन करण्यात आल्या तसेच मोहिमेअंतर्गत जी. प. यांच्यामार्फत कालावधित नियोजनबद्ध कृतिकार्यक्र म निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार गावी दुकानदार व ग्रामस्थ यांच्यामध्ये अंमलबजावणीबाबत ग्रामसभा घेऊन माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत बंदी असलेले प्लॅस्टिक व थर्मोकोल वस्तू जमा करण्याची मोहीम घेण्यात आली. प्लॅस्टिक उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक हाताळणी, साठवणूकबाबत अधिसूचना वाचन करण्यात आले. ग्रामस्थांना प्लॅस्टिक वापर बंद करून पर्यावरण रक्षण शपथ घेण्यात आली. अभियान राबविण्यासाठी सरपंच रामदास गारे, ग्रामसेवक सुरेश भांबारे, आरोग्य सेवक भोये, अविनाश रोकडे, सुनीता बगर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.