चांदवडला जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम
By admin | Published: August 21, 2016 01:08 AM2016-08-21T01:08:40+5:302016-08-21T01:09:32+5:30
गीतापाठ : सात दिवस वेगवेगळ्या रूपाने सजविले जातात गोपालकृष्ण
चांदवड : येथील होळकरकालीन श्री गोवर्धन गिरीधारी गोपालकृष्ण मंदिरात गोपालकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाल्याची माहिती रंगमहाल ट्रस्टचे व्यवस्थापक एम.के. पवार व पुजारी अंबादास दीक्षित यांनी दिली.
शुक्रवार, दि. १९ ते २५ आॅगस्ट पावेतो चालणाऱ्या या उत्सवात दररोज गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रींचा अभिषेक, रात्री ९ वाजता कीर्तन आदि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि. २१ आॅगस्ट रोजी नितीन महाराज मुडावदकर दि. २२ व २३ आॅगस्ट रोजी लौकीक महाराज जोशी तसेच दि. २४ आॅगस्ट रोजी सकाळी गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रींचा अभिषेक, जयंत महाराज नांदेडकर यांच्या कीर्तन होणार आहे. बुधवारी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुवारी (दि. २५) दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री जयंत महाराज नांदेडकर यांचे काल्याचे कीर्तनाने जन्माष्टमीचा समारोप होईल. यावेळी ५६ भोग ( विशेष नैवेद्य) समर्पण केले जातील, अशी माहिती अरुण दीक्षित, किशोर दीक्षित व दिक्षित परिवाराने दिली. उत्सव काळात श्रींची मूर्ती अर्धनारी, राधा, बालाजी, देवार्षीनारद, श्रीनाथजी, अशा विविध रुपात साजश्रृंगार करुन सजविली जाते. भाविकांना या काळात विविध रूपात श्रींचे दर्शन होत असते. (वार्ताहर)