चांदवडला कम्युनिस्ट पक्षाचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:45 AM2018-02-28T01:45:34+5:302018-02-28T01:45:34+5:30
चांदवड : येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (ंमार्क्सवादी) च्या वतीने मंगळवारी बाजार समितीपासून मोर्चा काढून मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
चांदवड : येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (ंमार्क्सवादी) च्या वतीने मंगळवारी बाजार समितीपासून मोर्चा काढून मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नेतृत्व कॉ. हनुमंत गुंजाळ, राजाराम ठाकरे, शब्बीर सय्यद, तुकाराम गायकवाड, भाऊसाहेब मोरे, नाना पवार आदींनी केले. पिढ्यान्पिढ्या वनजमिनी कसणाºया आदिवासी, बिगर आदिवासींच्या ताब्यातील वनजमिनी नावावर करणारा वनहक्क कायदा दि. १३ डिसेंबर २०१३ रोजी दावेदाराने वनजमीन कसत असलेल्या ठिकाणी सलग तीन पिढ्यांपासून रहिवासी असल्याचा पुरावा दिल्यानंतर वनहक्क कायद्याच्या कलम १३ मध्ये सुचविलेल्या सहा पुराव्यांपैकी दोन पुरावे दाव्यासोबत दाखल केले तर दावा पात्र झाला पाहिजे़ तसेच पात्र दावेदाराच्या ताब्यात असलेली चार हेक्टरपर्यंतची जमीन मंजूर केली पाहिजे, चांदवड येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आदिवासी, बिगर आदिवासी लोकांना निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊनसुद्धा घरे नावावर नाही. चांदवड ग्रामपंचायत गायरान जमिनीमध्ये राहत असलेले आदिवासी व बिगर आदिवासी येथील वस्तीची नोंद सातबारा आहे तरी ट्रस्टचे लोक या लोकांना
घरे बांधू देत नाही. राशेवाडी येथील वनजमीन सामुदायिक दावा मंजूर करावा व घरे नावावर करावी, जिल्हा परिषद शाळा बंद करू
नये आदींसह अकरा मागण्यांचे निवेदन मोर्चेकºयांनी तहसीलदारांना दिले. यावेळी वनविभागाचे पवार, ट्रस्टचे सुभाष पवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी वरिष्ठाकडे निवेदन पाठवून न्याय देऊ, असे आश्वासन दिले. मोर्चात सुखदेव केदारे, राजाराम ठाकरे, शंकर गवळी, रामू बाविस्कर, दौलत वाटाणे, तुकाराम बागुल, सुरेश पवार, नंदू माळी आदी सहभागी झाले होते़