चांदवडला गणेशमूर्ती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:42 PM2017-08-18T23:42:39+5:302017-08-19T00:14:16+5:30
येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात यू. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी विद्यालयात शाड ूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात यू. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी विद्यालयात शाड ूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे हे सहावे वर्षे असून, दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावर्षी एकूण १३५ विद्यार्थ्यांनी विविध रुपात गणेशमूर्तीं साकारल्या. गणेशस्तोत्र पठणाने कार्यशाळेला सुरुवात झाली. सहभागी विद्यार्थ्यांना शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यशाळेत माती भिजवणे, त्याचे गोळे करून त्यास बैठक, पोट, चेहरा, सोंड, कान, डोळे, मुकुट यांचा कशा प्रकारे आकार द्यायचा तसेच ब्रश पट्टी, आणि बांबूच्या कोरण्यांच्या साहाय्याने मूर्तीला अधिक आकर्षक कसे करावे, यांची माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेतून वेगवेगळ्या आकाराच्या गणेशमूर्ती साकारल्या. यावेळी हरित सेनेचे प्रमुख आर. एन. नेरकर, वाय. जी. सोनजे, आर. पी. चव्हाण उपस्थित होते. आकर्षक मूर्तींना प्राचार्य यू. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. यू. समदडिया, पर्यवेक्षक एम.टी. सोनी, सी. डी.निकुंभ आदींनी बक्षिसे जाहीर केली.