चांदवड अपघात : ‘१०८’च्या सहा रुग्णवाहिकांची आपत्कालीन धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:14 PM2018-06-07T15:14:21+5:302018-06-07T15:14:21+5:30

चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली.

Chandwad Accident: An emergency run of six ambulances of 108 | चांदवड अपघात : ‘१०८’च्या सहा रुग्णवाहिकांची आपत्कालीन धाव

चांदवड अपघात : ‘१०८’च्या सहा रुग्णवाहिकांची आपत्कालीन धाव

Next
ठळक मुद्देएकापाठोपाठ रुग्णवाहिका घटनास्थळी डॉक्टरांच्या चमुसह दाखल नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : येथील सोग्रस शिवरात महामार्गावर भाविक पर्यटकांची मिनी बस महामार्गालगत उभ्या असलेल्या नादुरूस्त वाळूच्या ट्रकवर पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा पुरविणाऱ्या ‘१०८’ च्या एकूण सहा रुग्णवाहिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहचविले.
चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. अपघाताचे स्वरुप व जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती या रुग्णवाहिकेने कळविताच जवळील १०८च्या सेवा देणा-या पिंपळगाव, उमराणे, सौंदाणे, देवळा, मनमाड या ठिकाणाहूनही रुग्णवाहिका तत्काळ पाठविण्यात आल्या. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरात एकापाठोपाठ रुग्णवाहिका घटनास्थळी डॉक्टरांच्या चमुसह दाखल झाल्याने सुमारे पंधरा ते वीस जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालय व नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविणे शक्य झाले. जखमींची व मृतांची संख्या अधिक असल्यामुळे ‘१०८’च्या रुग्णवाहिकांना  महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका व अन्य काही खासगी संस्थांच्या रुग्णवाहिकांनीही मदत केली. एकूणच रुग्णवाहिका मोठ्या संख्येने वेळेत दाखल झाल्याने जखमींना पुढील उपचार वेळेवर मिळाले.
घटनास्थळावरुन चांदवड, पिंपळगाव, उमराणे, सौंदाणे, देवळा, मनमाड या प्रत्येकी एक रुग्णवाहिके ने एकूण सहा ते सात रु ग्ण उपजिल्हा रुग्णालयात हलविले. प्रथोमोपचारानंतर पुढील उपचारासाठी चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयातून सकाळी ‘१०८’ च्या रुग्णवाहिकांमधून ११ रुग्णांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ.अश्विन राघमवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८ रुग्णांवर उपचार सुरू असून सहा रुग्ण आपत्कालीन कक्षात तर दोन अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. उर्वरित सहा रुग्णांना मुंबईनाका येथील सुयश या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अजून दोन जखमी रुग्ण या खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.



 

Web Title: Chandwad Accident: An emergency run of six ambulances of 108

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.