चांदवडला कृषी निविष्ठा दुकाने तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 08:20 PM2020-07-10T20:20:33+5:302020-07-11T00:07:57+5:30

चांदवड : चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने कृषिमाल विक्रेत्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील सर्व कृषिमाल विक्रेत्यांनी दि. १० ते १२ जुलैदरम्यान कृषी निविष्ठा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Chandwad agricultural inputs shops closed for three days | चांदवडला कृषी निविष्ठा दुकाने तीन दिवस बंद

चांदवडला कृषी निविष्ठा दुकाने तीन दिवस बंद

googlenewsNext

चांदवड : चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने कृषिमाल विक्रेत्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील सर्व कृषिमाल विक्रेत्यांनी दि. १० ते १२ जुलैदरम्यान कृषी निविष्ठा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गाचे खते, बियाणे खरेदीसाठी हाल होत आहे. प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके यांना चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्सचे अध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस अभिजित शेडगे, जिल्हा प्रतिनिधी काकासाहेब भालेराव यांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील कृषिमाल विक्रेते उपस्थित होते.
विक्रेता बियाणे उत्पादक अथवा बियाणे प्रमाणीकरण करण्याचे काम करीत नसल्याने विक्रेत्यावर गुन्हे नोंद करण्याची अन्यायकारक कार्यवाही रद्द करावी, सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळावे, रासायनिक खताच्या पुरवठ्यामध्ये लिकिंग बंद होऊन एफओआर मिळावे, विक्रेता बियाणे उत्पादन करीत नाही व गुणवत्तेची तपासणी करीत नाही. कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून गुणवत्तेबद्दल पडताळणी झालेले बियाणे सीलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करता व सीलबंद पॅकिंगमध्ये शेतकऱ्यांस विक्री करतो त्यामुळे बियाणे उगवण नसल्याबद्दल विक्रेत्यास जबाबदार धरुन त्यांचेवर गुन्हा दाखल करणे कि ंवा नुकसान भरपाईसाठी विचार करणे ही बाब विक्रेत्यावर अन्यायकारक असल्याने अशी कार्यवाही होऊ नये तसेच अनेक मागण्याचा समावेश या निवेदनात असून कोरोना रोगाचे प्रादुर्भावाचे लॉकडाऊनमुळे विक्रेत्याचे आर्थिक नुकसान होऊनही विक्रेत्यांनी राज्यातील शेतकरी बांधवाना बियाणे व रासायनिक खते, किटकनाशके औषधे पुरविण्याचे काम केले असूनही विक्रेत्यावर अन्यायकारक कार्यवाही केली जाते. राज्यातील सर्व विक्रेत्यांनी शेतकºयांना कृषी साहित्य पुरवण्याचे काम करुनही देशाचे आर्थिक उत्पादन वाढीचे कार्यक्रमास हातभार लावत असल्याने विक्रेत्यांचा बंद शेतकरी विरोधी व किंवा शासनाच्या विरोधात नाही. केवळ विक्रेत्यावर होणाºया अन्यायासाठी आम्ही दि. १० जुलै ते १२ जुलै या तिन दिवसात दुकाने बंद ठेवीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
-----------------
४राज्याच्या कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून शेतकºयांस विक्री करत असूनही खराब हंगाम २०२० चे खरीप हंगामामध्ये सोयाबीन इतर बियाणे पेरणीनंतर उगवत नाही. मात्र याला विक्रेत्यास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना राज्याचे कृषी आयुक्ताकडून कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.

Web Title: Chandwad agricultural inputs shops closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक