चांदवड : नामदेवराव जाधव विद्यालयात विविध आकर्षक उपकरणांची मांडणी ४३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:06 AM2017-12-13T00:06:33+5:302017-12-13T00:19:57+5:30
तालुकास्तरीय ४३ व्या विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती जिल्हा नव्हे तर देश पातळीवर चमकवून चांदवडचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तालुकापातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.
चांदवड : तालुकास्तरीय ४३ व्या विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती जिल्हा नव्हे तर देश पातळीवर चमकवून चांदवडचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तालुकापातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.
शिक्षण विभाग, पंचायत समिती, चांदवड तालुका विज्ञान अध्यापक संघ, कै. नामदेव बाबूराव जाधव माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. १२) व बुधवार (दि.१३) या दिवशी ४३ वे चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन येथील नामदेवराव बाबूराव जाधव विद्यालयात आयोजित केले आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती अमोल भालेराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव, पंचायत समिती सदस्य निर्मला अहेर, देवीदास अहेर, गटशिक्षणाधिकारी बी.टी. चव्हाण, प्राचार्य डी.आर. बारगळ, राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे, केदू देशमाने, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. स्वप्निल जाधव, सचिव प्रतीक जाधव, मुख्याध्यापक एल.एम. ठोसर, देवमन पवार, तालुका अध्यापक संघाचे विनायक पाटील, एन.पी. अहेर, प्रा. विक्रम काळे, वाय.एन. देवरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बी.टी. चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी आर.एन. निकम व एस.एस. कांबळे यांनी केले. यावेळी शाळेच्या प्रमुख सुमनबाई नामदेवराव जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात सुमारे २२० उपकरणे ठेवण्यात आली असून, प्रत्येक शाळेने त्यात भाग घेतला आहे. कार्यक्रमास मुख्याध्यापक जयश्री गोळेचा, श्रीधर देवरे, आर.एन. निकम, श्रीधर देवरे, एस.एस. कांबळे, श्रीमती एस.एस. रुईकर, बी.एन.सोनवणे, एन.पी.अहेर, विनायक पाटील, डी.के.शिंदे, साहेबराव देशमाने, शिवाजी शिंदे, केशवराव जाधव, सतीलाल शिरसाठ, जितेंद्र मानकर आदींसह सर्व केंद्रप्रमुख, अध्यापक संघ, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.