चांदवड बाजार समिती बेमुदत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:15 AM2018-04-04T00:15:41+5:302018-04-04T00:15:41+5:30
चांदवड : कोणतेही स्पष्ट कारण न देता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चांदवड : कोणतेही स्पष्ट कारण न देता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे शेतकºयांना आपला कांदा विकण्यासाठी इतर बाजार समित्यांना आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे शेतकºयांवर नाहक आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या चार दिवस सलग सुट्टी आल्याने बंद होती. त्यात मंगळवारी कांदा शेतमालाचे लिलाव होतील या अपेक्षेने सकाळी शेतकºयांनी आपला कांदा लिलावासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. लिलावाची निर्धारित वेळ टळून गेली तरी लिलाव सुरु होत नसल्याने संतप्त शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयांनी व्यापाºयांकडे विचारणा केली की, लिलाव का बंद आहेत? दरम्यान, काही व्यापारी लिलावात उपस्थित झाले होते. त्यांनी सुमारे ३०० टॅक्ट्ररचे लिलाव करून घेतले व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही पदाधिकाºयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विचारविनिमय करून कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत बंदचा आदेश दिला. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीत चौकशी केली असता वेगवेगळी उत्तरे मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी नाही, मार्च एन्डची कामे यामुळे बाजार समिती बेमुदत बंद करण्याचे ठरले असे मत आले तर काही कर्मचाºयांनी सांगितले की, मंगळवारी सुट्टी घ्यावी असे व्यापाºयांनी सांगितले होते; मात्र लेखी न दिल्याने सुट्टी जाहीर न केल्याने शेतकºयांची अडचण झाली असे तर बाजार समितीत पाणी नसले तरी विकत पाणी घेऊन काम चालू आहे असे दोन वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त केले गेले. व्यापारी असोसिएशनने सांगितले की, मंगळवार व बुधवार सुट्टी घ्यावी असा अर्ज दिला नाही. दरम्यान आज मंगळवारीही व्यापाºयांनी लिलावात भाग घेतला; मात्र अचानक बाजार समिती प्रशासनाने बेमुदत बंदचा निर्णय घेऊन शेतकºयांची कुंचबना केल्याचे सांगण्यात आले. याप्रश्नी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.