चांदवडला आढळले दोन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 08:25 PM2020-07-01T20:25:27+5:302020-07-01T20:25:51+5:30
चांदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे स्वॅब तपासणी साठी काल मंगळवारी पाठविण्यात आले होते ते आज बुधवार दि. १ जुलै रोजी ते प्राप्त झाले असून दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे स्वॅब तपासणी साठी काल मंगळवारी पाठविण्यात आले होते ते आज बुधवार दि. १ जुलै रोजी ते प्राप्त झाले असून दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सदर पुरु ष कर्मचारी हे एस. टी. महामंडळ नाशिक कार्यशाळा येथे कार्यरत आहेत त्यांचे कुटुंबातील इतर दोन व्यक्ति यांचे सुद्धा नमुने घेण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. नागरीकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे घाबरून जावू नये परंतु काळजी घ्यावी असे तहसीलदार पाटील यांनी सांगीतले.
दरम्यान, चांदवड नगरपरिषदेच्या वतीने आंबेडकर नगर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली तर निजुतंकीकरणाची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी सांगीतले. दरम्यान आंबेडकर नगर परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर केला असून नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी विनाकारन घराबाहेर पडू नये, आपल्याकडे येणार्या पाहुण्यांची माहिती तत्काळ प्रशासनास कळविण्याचे आवाहनही केले आहे.तालुक्यातील आठ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह चांदवड तालुक्यातील मेसनखेडे बुर्द्रुक येथील पॉझिटिव्ह रु ग्णाचे संपर्कातील आठ व्यक्तींचे अहवाल सोमवार दि. २९ जुन रोजी प्राप्त झाले सर्व आठ अहवाल निगेटिव्ह आल्याने चांदवड तालुक्यासाठी दिलासादायक बातमी असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगीतले. तर उपजिल्हा रुग्णालयाचा पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याचा दुसऱ्यांदा सुद्धा अहवाल पाॅिझटिव्ह आलेला आहे तथापि या दोन्ही रु ग्णांची तब्येत स्थिर आहे .नागरीकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आवश्यक ती सर्व खबरदारी बाहेर जाताना घ्यावी घाबरून जाऊ नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.