चांदवडला औषधविक्रेत्यांचा आज शंभर टक्के बंद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:47 PM2018-09-28T17:47:40+5:302018-09-28T17:47:55+5:30

चांदवड- भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी व देशव्यापी बंदमध्ये चांदवड येथील सर्व औषधे दुकानदारांनी शंभर टक्के सहभाग घेऊन बंद पुकारला या बंदमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले

Chandwad gets a hundred percent off successful today by drug dealers | चांदवडला औषधविक्रेत्यांचा आज शंभर टक्के बंद यशस्वी

चांदवडला औषधविक्रेत्यांचा आज शंभर टक्के बंद यशस्वी

Next

चांदवड- भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी व देशव्यापी बंदमध्ये चांदवड येथील सर्व औषधे दुकानदारांनी शंभर टक्के सहभाग घेऊन बंद पुकारला या बंदमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले.तरी अत्यावश्यक रुग्णांना मात्र या औषधविक्रेत्यांनी सहकार्य करुन त्यांना औषधे उपलब्ध करुन दिले. इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातुन आॅनलाईन औषध विक्री व ई पोर्टल याबाबत शासन व प्रशासनाची सकारात्मक भुमिका या विरोधात शुक्रवारी दि. २८ सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला.याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक , नायब तहसीलदार श्रीमती मिनाक्षी गोसावी यांना दिले. यावेळी केमिस्ट असोशिएशनचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य अतुल जाधव, चांदवड तालुका केमीस्ट असोशिएशनचे महेंद्र गांधी, प्रफुल्ल डोशी, मनीष ललवाणी, पंकज सोनवणे, श्रेणीक शहा, विवेक ठाकरे, अमोल कापडीया, जितेंद्र डुंगरवाल, कैलास पाटील, अािदसह सर्व औषध विक्रेते उपस्थित होते. यावेळी मात्र औषधविक्रेत्यांच्या बंदमुळे अत्यावश्यक सेवेची गरज पडल्याने रुग्णांना विशेष सेवा पुरविल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले.तर चांदवड तालुका औषधविक्रेत्यांनी चांदवड येथील श्री. रेणुका देवी मंदिरात जागतिक फार्मसी दिन साजरा करुन यावेळी जुन्या २५ वर्ष व अधिक सेवा देणारे औषधविक्रेत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व औषध विक्रेते बांधव उपस्थित होते.

Web Title: Chandwad gets a hundred percent off successful today by drug dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप