चांदवडला नवीन चार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:41 IST2020-08-05T23:58:10+5:302020-08-06T01:41:41+5:30
चांदवड : शहरात पुन्हा नवीन चार कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली. त्यात चांदवड येथील डांबरविहीर परिसर येथील चार महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत ते सर्व पूर्वीच्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.

चांदवडला नवीन चार कोरोनाबाधित
ठळक मुद्देसर्व पूर्वीच्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
चांदवड : शहरात पुन्हा नवीन चार कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली. त्यात चांदवड येथील डांबरविहीर परिसर येथील चार महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत ते सर्व पूर्वीच्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
उर्वरित सर्व १२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात नव्याने नऊ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. तरी नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले.
तर आतापर्यंत ९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ३२ रुग्ण उपचार घेत असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.