चांदवडला ५० ज्येष्ठ महिलांसह शिक्षकांचा सन्मान
By admin | Published: March 9, 2017 01:05 AM2017-03-09T01:05:21+5:302017-03-09T01:06:43+5:30
चांदवड : जागतिक महिला दिनानिमित्त येथील नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
चांदवड : जागतिक महिला दिनानिमित्त येथील नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून काढण्यात आलेल्या फेरीत नेमिनाथ जैन विद्यालय, जे. आर. गुंजाळ विद्यालय, होळकर विद्यालयातील एकूण ५०० विद्यार्थिंनी सहभाग घेतला. यानंतर नगर परिषद कार्यालयात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगरसेवक लीलाबाई माधव कोतवाल होत्या. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे व नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक जयश्री गोळेचा यांचे व्याख्यान झाले. सायली केदारे या चारवर्षीय बालिकेने स्त्रीभू्रण हत्त्या व स्त्रीशिक्षणावर विचार व्यक्त केले. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, लीलाबाई कोतवाल, गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये बक्षिसे देऊन सायलीचे कौतुक केले. उपनगराध्यक्ष कविता उगले यांनी सायलीचा सत्कार केला. तहसीलदार कार्यालयामार्फत महिला मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच नूतन नावनोंदणीसाठी नमुना नंबर ६ व ८ अर्जाचे वाटप करण्यात आले. त्यात विवाह होऊन आलेल्या नवविवाहितांची मतदार नोंदणी करण्याबाबत तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, नायब तहसीलदार हेमंत गुरव, जंगम, दिलीप मोरे, राजू उशीर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली.
कार्यक्रमात शहरातील ५० ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात सुमनबाई जंगम, सुमनबाई भंडागे, शांताबाई सांगळे, रुक्मिणी बनकर, इंदूबाई गुरव, ताराबाई गुवर, सीताबाई बरदे, रजिया घासी, चंद्रभागाबाई शेलार, लक्ष्मीबाई क्षत्रिय, शोभना भंडारी, झुमीयाबार्स बडोदे आदिंचा सत्कार करण्यात आला. सीमा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता उगले यांनी आभार मानले. कार्यक्रमास अर्चना पूरकर, प्रतिमा गुजराथी, नगरसेवक शालिनी भालेराव, सुनीता पवार, इंदूबाई वाघ, पार्वताबाई पारवे, जयश्री हांडगे, मीनाताई कोतवाल, रेखा गवळी, सविता बांगरे, सविता जगताप, शीला खैरनार उपस्थित होत्या. (वार्ताहर)