चांदवडला एका दिवसात २९ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:17+5:302021-05-21T04:15:17+5:30
----------------- पावसाळ्यापूर्वी घरे दुरुस्तीची मागणी चांदवड : आगामी पावसाळ्याच्या धर्तीवर शहरातील धोकादायक व पडावयास झालेल्या इमारती तसेच ...
-----------------
पावसाळ्यापूर्वी घरे दुरुस्तीची मागणी
चांदवड : आगामी पावसाळ्याच्या धर्तीवर शहरातील धोकादायक व पडावयास झालेल्या इमारती तसेच नदी, नाल्याच्या लगत असलेल्या झोपड्या व टपऱ्या दुकाने संबंधितांनी काढून घ्यावी, असे आवाहन चांदवड नगर परिषदने केले आहे. धोकादायक इमारती घरे दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित मालकांची असल्याने काही हानी झाल्यास त्यास संबंधित मालक जबाबदार राहतील, असे पत्रकात म्हटले आहे.----------------------------------------------------------------------------
मुंबई आग्रा रोडची दुरुस्तीचे कामे प्रगतिपथावर
चांदवड : लॉकडाऊनचा फायदा घेत मुंबई आग्रा रोडवरील चौपरीकरण रस्त्याची अवस्था पावसामुळे खराब झाल्याने टोल रस्ते कंपनीच्या वतीने या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. वाहनाची संख्या कमी असल्याने व पावसाळ्यापूर्वी या रोडची डागडुजी सुरू असल्याचे दिसत आहे.