चांदवड बाजार समितीत कांद्याला १८२६ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:25+5:302021-05-27T04:15:25+5:30
गेल्या बारा दिवसांपासून कांदा लिलाव कोरोना पार्श्वभूमीवर बंद होते. त्यातच कांदा लिलावास शासनाने सुरुवात करण्यास सांगितले. मात्र, शेतकऱ्यांची बाजार ...
गेल्या बारा दिवसांपासून कांदा लिलाव कोरोना पार्श्वभूमीवर बंद होते. त्यातच कांदा लिलावास शासनाने सुरुवात करण्यास सांगितले. मात्र, शेतकऱ्यांची बाजार समितीत प्रवेश करताना कोरोना चाचणी अनिर्वाय केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्यात चाचणी सक्तीमुळे अनेक शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत नसल्याची बाब लक्षात आल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधून शेतकऱ्यांची चाचणी करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी बाहेरून कुठूनही कोरोना चाचणी करूनच यावे, असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले असल्याचे शेतकरी वाहने घेऊन कांदा विक्रीसाठी आणत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आवकेत मोठी घट झाली. पर्यायाने बाजार समितीच्या उत्पनात घट झाल्याचे दिसत आहे.