चांदवड मर्चण्ट बँकेवर सहकार पॅनलचीच सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 02:16 AM2022-03-22T02:16:05+5:302022-03-22T02:16:32+5:30

चांदवड मर्चण्ट बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलला १७ जागा मिळून विरोधी विकास सहकार पॅनलचा धुव्वा उडाला. भूषण कासलीवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले.

Chandwad Merchant Bank is governed by a co-operative panel | चांदवड मर्चण्ट बँकेवर सहकार पॅनलचीच सत्ता

चांदवड मर्चण्ट बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार आनंदोत्सव साजरा करतांना.

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पॅनलचा धुव्वा : शिरीषकुमार कोतवाल यांनी पुन्हा मारली बाजी

चांदवड : चांदवड मर्चण्ट बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलला १७ जागा मिळून विरोधी विकास सहकार पॅनलचा धुव्वा उडाला. भूषण कासलीवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले.

चांदवड मर्चण्ट बँकेच्या १८ जागांसाठी दि.२० मार्चला मतदान झाले. सोमवारी (दि. २१) सकाळी ८ वाजता गणूर रोडवरील चंद्रभागा लॉन्स येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री उशिरा निकाल हाती आले. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या सहकार पॅनलला १७ जागा, तर त्यांच्या विरोधात माजी आमदार स्व. जयचंद कासलीवाल यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुन्नुभाई घासी, जगन्नाथ राऊत, सुनील डुंगरवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या सहकार पॅनलचे सर्वसाधारण १३ जागांमध्ये विजयी उमेदवार व मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे - सुनील कबाडे (१६८४), नरेंद्र कासलीवाल (१३५७), वाहीदखान पठाण (१११२), भूषण पलोड (१५०५), अदित्य फलके (१४६०), पुष्पा राजेंद्र बिरार (११८७), दत्तात्रेय राऊत (११२६), अशोक व्यवहारे (१२८०), भिकचंद व्यवहारे (१२३९), जाहीद शेख (१०७१) गुल्लुभाई ऊर्फ सईद खलील शेख (११४७), राजकुमार संकलेचा (१२४३) तर विकास सहकार पॅनलचे महेंद्र गांधीमुथा (१२८२) हे विजयी झाले. महिला राखीव दोन जागेसाठी शिल्पा आत्माराम कुंभार्डे (१५६१), तर भारती अशोक देशमुख (१४९७). अनुसूचित जाती-जमाती गटात एक जागेसाठी शंभुराजे खैरे (१६८१), इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक जागेसाठी राहुल शिरीषकुमार कोतवाल (१६४२), भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गासाठी जाकीर गफ्फार शहा (१३३४) मते मिळून विजयी झाले. विकास सहकार पॅनलला एकमेव जागेवर महेंद्र गांधीमुथा यांच्या रूपाने विजय मिळाला. निवडणूक अधिकारी पी. एस. पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. निवडणुकीचे निकाल हाती येताच सहकार पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष केला.

 

 

Web Title: Chandwad Merchant Bank is governed by a co-operative panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.