चेक बाउन्स प्रकरणी चांदवड मर्चण्ट्स कर्जदारास शिक्षा

By admin | Published: November 12, 2016 11:09 PM2016-11-12T23:09:14+5:302016-11-12T23:11:52+5:30

चेक बाउन्स प्रकरणी चांदवड मर्चण्ट्स कर्जदारास शिक्षा

Chandwad Merchants' education to the borrower in the check bounce case | चेक बाउन्स प्रकरणी चांदवड मर्चण्ट्स कर्जदारास शिक्षा

चेक बाउन्स प्रकरणी चांदवड मर्चण्ट्स कर्जदारास शिक्षा

Next


चांदवड : येथील दी चांदवड मर्चण्ट्स बॅँकेचे सभासद जाकीर महमंद ईस्माईल मिसगर, रा. सोमवारपेठ , चांदवड यांनी बॅँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी दिलेले चेक बाउन्स झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येऊन न्यायालयाने त्यांना फसवणूक केल्याबद्दल कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बॅँकेतर्फे अ‍ॅड. विशाल व्यवहारे यांनी काम बघितले.
मिसगर यांनी रुपये ९५ हजारचे नजरगहाण कर्ज व १५ हजार रुपयांचे कॅश के्रडिट कर्ज घेतले होते. नजरगहाण कर्जाच्या एकूण बाकी रकमेपैकी परतफेडीपोटी रुपये ७५ हजारांचा धनादेश व कॅश क्रेडिट कर्जाच्या एकूण बाकीपैकी परतफेडीपोटी रुपये सहा रुपयांचा धनादेश मिसगर यांनी बॅँकेला दिलेला होता. परंतु त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने सदरचे दोन्ही चेक बाउन्स झाले. त्यामुळे दी चांदवड मर्चण्ट्स को- आॅप. बॅँकेने कर्जदार मिसगर यांच्या विरोधात चांदवड न्यायालयात फिर्याद दाखल केल्या होत्या.
सदर दोन्ही प्रकरणामध्ये फिर्यादी व आरोपी यांचा साक्षीपुरावा घेऊन आरोपी जाकीर मोहमंद इस्माईल मिसगर यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायमूर्ती एस.एस. धपाटे यांनी मिसगर यांना सदर नजरगहाण कर्जाच्या प्रकरणात सहा महिन्यांच्या कारावासांची शिक्षा व एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या जादा कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तर कॅश के्रडिट कर्ज प्रकरणात तीन महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या जादा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (वार्ताहर)

Web Title: Chandwad Merchants' education to the borrower in the check bounce case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.