चांदवड महावितरणची वीजवसुलीसाठी धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:30+5:302021-07-17T04:12:30+5:30

चांदवड : शहरात महावितरणने वीजवसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केली असून अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र ...

Chandwad MSEDCL's campaign for recovery of electricity | चांदवड महावितरणची वीजवसुलीसाठी धडक मोहीम

चांदवड महावितरणची वीजवसुलीसाठी धडक मोहीम

Next

चांदवड : शहरात महावितरणने वीजवसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केली असून अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कोरोनाच्या काळात सुद्धा महावितरणाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. या काळात घरोघरी ग्राहकांनी वीज बिले भरले नसल्यामुळे थकबाकीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. वीज बिलवसुली मोहीममध्ये कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, उपकार्यकारी अभियंता अनिलकुमार तिवारी, उमेश पाटील, सहायक अभियंता राहुल शिंदे व अनेक जनमित्र सहभागी झाले होते. सर्व वीजग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे व विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी तर विभागातील ८५०० शेती पंप ग्राहकांनी रुपये ३५ कोटी थकबाकी भरून कृषी धोरण योजनेचा लाभ घेतला आहे. उर्वरित शेतीपंप ग्राहकांनी सुद्धा थकबाकी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कंपनीच्या वतीने केले आहे.

-------------

५९ कोटींची थकबाकी

चांदवड तालुक्यात एकूण थकबाकी रुपये ५९ कोटी असून, चांदवड शहरातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी रुपये सव्वाकोटीपर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे विभागांतर्गत धडक वसुली मोहीम चालू केली आहे, तर दि. १५ जुलै रोजी शहरात वीजबिल वसुली मोहीम राबवित आहे. ज्या ग्राहकांनी वीज बिल भरले नाही अशा सर्व ग्राहकांचे विद्युत पुरवठा खंडित केले आहे.

---------------------------------------------------------

चांदवड येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज देयकांची वसुली करताना रस्त्यावर उतरलेले जनमित्रापासून ते कार्यकारी अभियंता. (१६ एमएमजी २)

160721\16nsk_6_16072021_13.jpg

१६ एमएमजी २

Web Title: Chandwad MSEDCL's campaign for recovery of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.