चांदवडला दुकाने बंद करण्याच्या आदेशाने सभ्रंम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:52 PM2020-07-09T19:52:14+5:302020-07-10T00:22:49+5:30
चांदवड : शहरात गुरुवार दि. ९ जुलै रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नगरपरिषदेपासून ते सोमवार पेठ व बाजार तळ, बसस्थानक परिसरातील दुकाने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास सांगण्यास व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.

दरम्यान याबाबत अधिक चौकशी केली असता कोविड -१९ च्या विशेष तपासणी मोहीमेसाठी जिल्हाधिकारी व एक जिल्हा स्तरीय समिती येणार असल्याने दुकाने बंद ठेवावी असे सांगण्यात आले. दरम्यान अर्धातासात काही दुकाने उघडली तर काही दुकाने सम व विषम पध्दतीने बंद ठेवण्यात आल्याने व्यापारी वर्ग गोंधळात सापडला तर ही जिल्हास्तरीय तपासणी समिती आली की नाही याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणीही उत्तर दिले नाही. सातत्याने होणाºया बंदच्या मोहीमेमध्ये व्यापारी हकनाहक भरडला जात असून ग्राहकही सभ्रंमात पडत असल्याने नगरपरिषदबद्दल व्यापारी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे.