चांदवडला शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 04:09 PM2020-10-26T16:09:30+5:302020-10-26T16:09:30+5:30

चांदवड - चांदवड तालुक्यातील समेट येथील रहिवासी व राज्य राखीव बल ( एस.आर.पी.एफ) च्या आस्थापनेतील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम विठ्ठलराव कोळपकर यांचे मंगेझरी जि. गोंदिया येथे कर्तव्य बजावत असतांना भु- सुरुंग स्फोटात ते शहीद झाले.तसेच पोलीस उपनिरीक्षक अरुण पुंजाजी पवार मेसनखेडे ता. चांदवड हे राजुरा चंद्रपुर येथे नोकरीस असतांना कर्तव्य बजावतांना शहीद झाल्याने या दोन्ही शहिदांना चांदवड पोलीस स्टेशनमध्ये शहीद दिन आदराजली वाहण्यात आली.

Chandwad pays homage to martyred police personnel | चांदवडला शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली

चांदवडला शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली

Next
ठळक मुद्देशहीदांचे आई वडील पोलीस कर्मचारी उपस्थित.

चांदवड - चांदवड तालुक्यातील समेट येथील रहिवासी व राज्य राखीव बल ( एस.आर.पी.एफ) च्या आस्थापनेतील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम विठ्ठलराव कोळपकर यांचे मंगेझरी जि. गोंदिया येथे कर्तव्य बजावत असतांना भु- सुरुंग स्फोटात ते शहीद झाले.तसेच पोलीस उपनिरीक्षक अरुण पुंजाजी पवार मेसनखेडे ता. चांदवड हे राजुरा चंद्रपुर येथे नोकरीस असतांना कर्तव्य बजावतांना शहीद झाल्याने या दोन्ही शहिदांना चांदवड पोलीस स्टेशनमध्ये शहीद दिन आदराजली वाहण्यात आली.

यावेळी दोघांचे प्रतिमाचे पुजन करण्यात आले. यावेळी सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक दीपक तायडे, धीरजकुमार नंदागवळी, सशस्त्र पोलीस नाईक शंशाक शेवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल सोनेरी आदि उपस्थित होते. तर चांदवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत अध्यक्षस्थानी होते.

यावेळी उपनिरीक्षक विशाल सणस यांनी आभार मानले. तर या दोन्ही शहीदांचे आई वडील व चांदवड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Chandwad pays homage to martyred police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.