चांदवडमधील पोलीस चौकीचा वाद न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:28+5:302020-12-04T04:37:28+5:30
चांदवड तालुक्यातील शिंगवे येथे पोलीस दुरपरिक्षेत्र येथे पोलीस चौकी चांगल्या अवस्थेत आहे. शिंगवे पोलीस चौकीत दोन हवालदार, दोन ...
चांदवड तालुक्यातील शिंगवे येथे पोलीस दुरपरिक्षेत्र येथे पोलीस चौकी चांगल्या अवस्थेत आहे. शिंगवे पोलीस चौकीत दोन हवालदार, दोन पोलीस नाईक व तीन कर्मचारी असे सात कर्मचारी आहेत. येथे महिला कर्मचारी नाही. शिंगवे येथील पोलीस चौकी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधली असून, चांगल्या स्थितीत आहे. येथे बसण्यासाठी व पोलीस कर्मचारी निवारा व्यवस्था, शौचालय आदी चांगल्या सुविधा असल्याने ही चौकी सुस्थितीत आहे. चांदवड शहरात बसस्थानकाजवळ जुने न्यायाधीश निवासस्थानाची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती. येथील न्यायालय निवासस्थान नवीन कोर्टाच्या आवारात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे पोलीस चौकी उभारली. मात्र ही चौकी नावाला आहे. सध्या ती बंद अवस्थेतच आहे. त्यामुळे ही अधिकृत चौकी नाही. मात्र चांदवड शहरात गुन्हेगारी वाढू नये, अपघातप्रसंगी त्वरित जाण्यासाठी व पेट्रोलिंगसाठी या चौकीचा उपयोग होईल, या उद्देशाने पोलीस चौकी उभारली असली तरी वादामुळे ती नावापुरताच आहे.
चांदवड पोलीस स्टेशन अंतर्गत दोन पोलीस चौकी असल्या तरी चांदवड येथील बसस्थानकाजवळची चौकी बंद आहे. या चौकीच्या जागेचा वाद कोर्टात सुरू असून, चांदवड ही चांगली बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती व मुंबई आग्रारोडवर असल्याने तसेच वर्दळ मोठी असल्याने येथे मध्यवर्ती भागात एक चौकी असावी, यासाठी वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.
- स्वप्निल राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चांदवड
फोटो- २७ एम.एम.जी.२