चांदवड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:56 PM2018-11-18T17:56:49+5:302018-11-18T17:58:47+5:30
चांदवड मोहल्ला शांतता कमिटी कौमी एकता मित्र मंडळ तथा तालुका क्रि केट असोसिएशन यांच्या माध्यमातून चांदवड प्रीमिअर लीगला (चांदवड सीपीएल) रविवारपासून दुसऱ्या सत्राचा थरार सुरू झाला. या स्पर्धा कालिका मैदानावर संयोजक व प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाल्या असून या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापूर्वी चांदवड शहरातून मिरवणुक काढण्यात आली.त्यानंतर तालुका क्रीडा संकुलनाच्या पटांगणावर स्पर्धेचे उद्घाटन चांदवडचे न्यायमुर्ती के.जी.चौधरी, क्रीडा असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष धनपाल शहा, सचिव समीर रकटे ,प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे , पोलीस निरीक्षक संजय पाटील, सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, शिवसेना नेते जगन्नाथ राऊत, बाळासाहेब वाघ,सुकदेव जाधव, अॅड. शांतराम भवर, मनोज शिंदे, प्रा. सचिन निकम, बाळु वाघ, प्रा.महेश वाघ, दिगंबर वाघ, चंदे्रशेखर कासलीवाल, अनिल अग्रवाल, डॉ.भालचंद्र पवार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्तविकात प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी गेल्या वर्षीच्या प्रिमीयर लिगनंतर या वर्षीही चांदवडकरांना या लिगचा थरार बघण्यास व अनुभवण्यास मिळणार असल्याची महिती दिली. चांदवड तालुक्यातून या लीगसाठी निवड चाचणी घेण्यात येऊन त्यातून १८० खेळाडू निवडून ते सोडतीद्वारे १२ संघमालकांना विभागून देण्यात आले. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना आपले क्र ीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांना याद्वारे मोठे क्रीडा व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे प्रांताधिकारी भंंडारे यांनी सांगीतल. सूत्रसंचालन तालुका क्रिकेट असोशिएशनचे डॉ. उमेश काळे यांनी तर स्वागत सचिन राऊत, संतोष बडोदे यांनी केले. आभार प्रा. सचिन निकम यांनी मानले.