चांदवडला एका दिवसात नऊ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:19+5:302021-06-20T04:11:19+5:30
-------------------------------------------------- मंगरुळला महिलांची ई-लर्निंग शेतीशाळा चांदवड : तालुक्यातील मंगरुळ येथे कृषी सहायक स्वाती झावरे यांच्या उपस्थितीत महिलांची ई-लर्निंग शेतीशाळा ...
--------------------------------------------------
मंगरुळला महिलांची ई-लर्निंग शेतीशाळा
चांदवड : तालुक्यातील मंगरुळ येथे कृषी सहायक स्वाती झावरे यांच्या उपस्थितीत महिलांची ई-लर्निंग शेतीशाळा ऑनलाइन पद्धतीने झाली. तालुका कृषी अधिकारी कारंजा संतोष वाळके यांची उपस्थिती होती. सोयाबीनविषयीच्या महिला शेती शाळेला महिलांनी हजेरी लावली. सध्या कोरोना परिस्थितीत २० ते २५ शेतकरी एकत्र जमण्यास घाबरतात, अशावेळी ऑनलाइन हे माध्यम वापरुन शेतकरी आपापल्या शेतावरून जॉईन झाले. या शेती शाळेत कृषी सहायक प्रवीण सानप यांनी औरंगाबाद येथून प्रत्यक्षात बीजप्रक्रिया कशी करायची, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तर हेमंत पाटील कोल्हापूर, निखिल कलारकर विदर्भातून या शेतकऱ्यांचे त्यांनी शेतात वापरलेले तंत्रज्ञान कमी खर्च, कमी वेळेत जास्त उत्पादन कसे घेतले, त्याबद्दल मार्गदर्शन केले. पंचायत समिती सभापती पुष्पा धाकराव, मंगरुळच्या सरपंच रेखा ढोमसे, प्रगतीशील महिला शेतकऱ्यांनी हजेरी लावली. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विठ्ठल धांडे, बुलडाणा व संतोष पाटील यांनी कोल्हापूरवरून मार्गदर्शन केले.