चांदवड : कृउबा समितीत फुलांचे नियमित लिलाव सुरू
By admin | Published: October 1, 2016 11:19 PM2016-10-01T23:19:15+5:302016-10-01T23:27:12+5:30
परिसरातील शेतकऱ्यांची झाली सोय
चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर शुक्रवारपासून (दि. ३०) फुले शेतमालाचे नियमित लिलाव सुरू करण्यात आले. दि. २ सप्टेंबरपासून फुलांच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला होता.
शुुभारंभानंतर मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होऊन चांगले
भाव मिळत होते. परंतु मधल्या
काळात पितृपक्ष असल्याने फुलांची मागणी कमी होऊन आवकेवर परिणाम झाला होता. त्यामुळे
फुले खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
होते. परंतु पुढील काही दिवसांमध्ये नवरात्रोत्सवामुळे झेंडू फुलांंना मोठ्या प्रमाणात मागणी राहील तसेच शेतकऱ्यांच्या फुलांना चांगले बाजारभाव मिळतील. समिती कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड झालेली आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या अध्यक्षतेखाली फुले खरेदीदार व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी संचालक विलास ढोमसे, पंढरीनाथ खताळ व फुले खरेदीदार व्यापारी उपस्थित
होते.
दररोज दुपारी लिलाव होणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपली फुले ट्रॅक्टर, पिकअप वाहनात मोकळ्या स्वरूपात आणावी, असे आवाहन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर व संचालक मंडळाने केले आहे. (वार्ताहर)