पीककर्जाबाबत चांदवड शिवसेनेचे जिल्हा बँकेला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:55+5:302021-06-05T04:10:55+5:30
शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, तालुका संघटक केशव ठाकरे, रंगनाथ पवार, घमाजी राजे सोनवणे, ज्ञानेश्वर आवारे, ...
शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, तालुका संघटक केशव ठाकरे, रंगनाथ पवार, घमाजी राजे सोनवणे, ज्ञानेश्वर आवारे, राजेंद्र शिंदे, योगेश सोनवणे, रवि शिंदे, भिलू जाधव, सागर मेचकूल, दशरथ ठोंबरे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी शेतकऱ्यांचे शासनाने पीककर्ज माफ करून २०२०-२१ करिता बँकांना नवीन पीककर्ज वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना एकूण कर्ज मंजुरीच्या फक्त ४० ते ५० टक्केच कर्जवाटप केले. सदरचा कर्ज भरणा केल्यास पुढील वर्षी नवीन कर्ज मंजुरी प्रमाणे शंभर टक्के कर्जवाटप करू, असे आश्वासन देण्यात आले; परंतु दि. ३१ मार्चपर्यंत बँकेने कर्ज भरून घेतले व पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बँकेने पन्नास टक्के कर्जवाटप करून ऐन हंगामाच्या तोंडावर अडचणीत भर घातली. त्यामुळे बँकेने शेतकऱ्यांना शंभर टक्के पीककर्ज वाटप करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
फोटो- ०४ चांदवड शिवसेना
चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे अधिकारी भूषण जाधव यांना निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर. समवेत विलास भवर, केशव ठाकरे, रंगनाथ पवार, घमाजी राजे सोनवणे आदी.
===Photopath===
040621\04nsk_22_04062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ चांदवड शिवसेना चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे अधिकारी भूषण जाधव यांना निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर. समवेत विलास भवर, केशव ठाकरे, रंगनाथ पवार, घमाजी राजे सोनवणे आदी.