चांदवडला दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 10:36 PM2021-04-20T22:36:58+5:302021-04-21T00:39:19+5:30

चांदवड : नगर परिषदेच्या हद्दीतील भाजीपाला, किराणा, दूध व जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११ वेळेत अवघी चार तास उघडी राहणार आहेत. मात्र मेडिकल स्टोअर्स, दवाखाने यांना वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस कडक निर्बंध लागू राहतील.

Chandwad shops will remain open till 11 am | चांदवडला दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडी राहणार

चांदवडला दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडी राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देबाधितांची संख्या वाढत आहे.

चांदवड : नगर परिषदेच्या हद्दीतील भाजीपाला, किराणा, दूध व जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११ वेळेत अवघी चार तास उघडी राहणार आहेत. मात्र मेडिकल स्टोअर्स, दवाखाने यांना वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस कडक निर्बंध लागू राहतील. भाजीपाला व किराणा वस्तूंच्या दुकानांसह सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पत्रक मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी काढले. काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधितांची संख्या वाढत आहे.

या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नगर परिषदेच्या परिसरात मर्यादित वेळेत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, तर भाजीपाला, फळे, दूधविक्रेते, किराणा दुकानदारांनी रॅपिड अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असून, रॅपिड अँटिजेन चाचणी न करता दुकाने उघडली, तर त्यांच्या आस्थापना सील करण्यात येतील, तसेच सर्व दुकानदारांनी व त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा व येणाऱ्या ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील, असे कदम यांनी आदेशात म्हटले आहे.

Web Title: Chandwad shops will remain open till 11 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.