चांदवड एस.एन.जे.बी. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 05:40 PM2018-09-02T17:40:45+5:302018-09-02T17:46:56+5:30
चांदवड - येथील एस.एन.जे.बी.संचलित स्व. सौ.कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋृषीकेश कासलीवाल, ज्ञानेश पाटील, प्रसाद ढोले या खेळाडूंनी महाराष्टÑ किक बॉक्सींग असोशिएशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.डी.कोकाटे यांनी दिली.
चांदवड - येथील एस.एन.जे.बी.संचलित स्व. सौ.कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋृषीकेश कासलीवाल, ज्ञानेश पाटील, प्रसाद ढोले या खेळाडूंनी महाराष्टÑ किक बॉक्सींग असोशिएशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.डी.कोकाटे यांनी दिली.या विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या वजनी गटात सहभाग नोंदविला व आपल्या कौशल्याचा जोरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राज्यातील इतर खेळाडूंना पराजित करुन सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.या खेळाडूंनी भारतीय किक बॉक्सींग संघटनेच्या वतीेने आॅक्टोबर महिन्यात गोवा येथे होणाऱ्या राष्टÑीय किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली . या तीनही खेळाडूंची महाराष्टÑ राज्याच्या संघात निवड झाली आहे. त्यांना प्रा.के.सी. पवार, ऋृषीकेश कासलीवाल यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंचा प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ.एम.डी.कोकाटे ,यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एस.डी. संचेती , संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एम.आर. संघवी व प्राध्यापकांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.